गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच शिवसेनेने 14 जागा जिंकुन अस्तित्व केले सिद्ध.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली : नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने 14 जागा जिंकुन आपले अस्तित्व सिध्द केले आहे.विशेष म्हणजे जेथे शिवसेना संपली होती त्या दक्षिण गडचिरोलीतील पाच नक्षलग्रस्त तालुक्यामध्ये पहिल्यादाच 9 जागा निवडुन आणण्याची किमया शिवसेनेने केली.या विजयाचे खरे शिल्पकार म्हणुन शिवसेना जिल्हा समन्वयक प्रमुख किरण पांडव यांच्याकडे बघितले जात आहे.शिवसेनेला गडचिरोली जिल्ह्यातील नगरपंचायत अहेरीत 2,मुलचेरात 4,सिरोंचा 2,भामरागड 1,असे एकुण 9 जागा मिळाल्या.आणखी काही अपक्ष नगरसेवक शिवसेनेत आल्याने संख्येत वाढ झाली आहे.राज्यात नगरपंचायतीच्या निवडणुका घोषीत झाल्यानंतर हायकमांडने किरण पांडव यांना गडचिरोली जिल्ह्याचे धुरा सांभाळण्याकरिता शिवसेनेचे जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक प्रमुख बनविण्यात आले.सर्व प्रथम किरण पांडव यांनी शिवसेनेत असलेली गटबाजीचा वाद सोडविण्याचा प्रयत्न करून सर्व शिवसैनिकांना एकञ आणण्याचा प्रयत्न केला.समन्वयातुन प्रामाणिक शिवसैनिकांना हाताशी घेतले.मागील वर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पांडव यांच्या प्रयत्नाने काही ठिकाणी यश मिळविले होते.पुढील महीन्यात गडचिरोली जिल्हा परिषद ची मुदत संपत आहे तसेच देसाईगंज व गडचिरोली नगरपरिषदची मुदत संपली आहे.त्यामुळे एक-दोन महीन्यात सदर निवडणुकाचे बिगुल वाजु शकते.त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेला चांगली संधी आहे. गडचिरोली विधानसभेतील चामोर्शी व धानोरा या दोन नगरपंचायतीत शिवसेनेला एकही जागा काबीज करता आली नाही.तसेच माजी जिल्हा प्रमुखाचे गड मानले जाणारे अहेरी विधानसभेतील एटापली नगरपंचायतीत शिवसेनेला एकही जागा मिळविता आली नाही.माञ कुरखेडा नगरपंचायतीत शिवसेनेचे पाच उमेदवारानी दणदणीत विजय मिळवित गड निर्माण केला आहे.आता पुढिल होणाऱ्या नगरपरिषद व जिल्हा परिषद निवडणुकीकरिता शिवसेना नेत्यांची कसोटी लागणार हे माञ निश्चीत.











