सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर : तहसिल कार्यालयात मतदार दिन मोठ्या उत्सावात साजरा करण्यात आला. त्यावेळी गणेश राठोड उपविभागीय दंडाधिकारी मेहकर म्हणाले की प्रत्येक व्यक्तिला वयाच्या १८ वर्ष पुर्ण असलेल्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे.त्यामुळे देशाची लोकशाही अधिक मजबूत राहीली आहे.२५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो.लोकशाहीच्या रक्षणासाठी जागरुक राहण्यासाठी या दिवशी मतदारांना मतदानाची शपथ दिली जाते.असे गणेश राठोड उपविभागीय दंडाधिकारी मेहकर यांनी यावेळी प्रतिपादन केले.तर तहसिलदार डॉ संजय गलकर यांनी यावेळी आहवान केले की,मेहकर मतदार संघातील ज्या मतदारांनी १ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्ष वय पुर्ण केलेले असेल व ज्या मतदारांनी अद्याप आपले नाव मतदार यादी मध्ये नोंदणी केलेले नसेल अशा सर्व युवकांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ठ करण्याचे आवाहन केले. त्यासाठी www.nvsp.in किंवा Voter Helpline या मोबाईल APP चा ऑनलाईन अर्ज करण्याकरीता वापर करण्याचे आवाहन तहसिलदार डॉ संजय गलकर यांनी केले.तसेच यावेळी राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधुन मेहकर शहरातील सर्व शाळांमध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यातील विशेष प्राविण्य प्राप्त विदयार्थ्याना प्रशस्तिपत्र वितरण करण्यात आले.१२ राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी गणेश राठोड उपविभागिय अधिकारी मेहकर यांना बुलडाणा जिल्हयातुन उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणुन निवड झाल्याने महसुल कर्मचारी संघटनेच्या वतीने अजय पिंपरकर नायब तहसिलदार,विजय लोखंडे अ.का. यांनी उपविभागिय दंडाधिकारी गणेश राठोड यांचा सत्कार केला. तसेच उत्कृष्ट पर्यवेक्षक म्हणुन गजानन ढोके नायब तहसिलदार,उत्कृष्ट मतदान केंद्रस्थरीय अधिकारी म्हणुन संजय इंगोले रायपुर, विठ्ठल गावंडे उमरा, रविंद्र अंभोरे डोणगाव, संतोष चोपडे देऊळगाव माळी,सिमा जोशी बदनापुर अशा एकुण ०५ मतदान केंद्रस्थरीय अधिकारी यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानीत करण्यात आले.तसेच जिल्हास्तरावर उत्कृष्ट मतदान केंद्रस्थरीय अधिकारी म्हणुन मतदार संघामधुन अरुण बळी देऊळगाव माळी यांची निवड झाली. कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता रामचंद्र नवघरे , यांनी विशेष सहकार्य केले तर आभार प्रदर्शन नितीन बोरकर नायब तहसिलदार निवडणुक यांनी केले.तर सुत्रसंचालन प्रविण परमाळे यांनी केले.