सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर : दिनांक 24/01/2022 रोज सोमवार ला शेंदुरजन येथे मंगल कार्यालय व लॉन्स च्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दामुअण्णा महाराज शिंगणे यांचे आई वडील सौ. वत्सलाबाई गुलाबराव शिंगणे व गुलाबराव शामराव शिंगणे यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन होणार असुन या कार्यक्रमाला उपस्थिती म्हणुन अन्न व औषध प्रशासन मंत्री. तथा पालकमंत्री बुलढाणा डॉ. राजेंद्र शिंगणे साहेब. आमदार संजय गायकवाड मा. आ. विजयराज शिंदे मा. आ. राहुल भाऊ बोंद्रे. मा. जि. प. अध्यक्ष नरुभाऊ खेडेकर. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष समाधान सावळे. समाजसेवक रमेश अण्णा मुळे तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सर्व संत मंडळींची उपस्थिती राहणार आहे. या मध्ये आदर्श गाव खासगाव चे आदर्श सरपंच संतोषराव लोखंडे यांचा व ग्रामीण भागा तील कवी रामदास कोरडे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात कुठलेही कार्य करायचे असल्यास निसर्गाच्या ऐन वेळी उद्भवणाऱ्या संकटाला तोंड देण्यासाठी मोठ्या प्रमाणात निवाऱ्याची सोय नसते परिणामी वेळेवर खुप ञास सहन करावा लागतो ही बाब लक्षात घेऊन दामु अण्णा महाराज यांनी शेंदुर जन परिसरासाठी सुंदर अश्या ज्ञानराज मंगल कार्यालय व लॉन्स ची निर्मिती केली आहे. अगदी माफक दरात गोरगरिबांचे शुभकार्य आता आनंदात पार पडणार आहेत. तरी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवत असताना सर्वांनी कोरोनाच्या नियमाचे पालन सर्वांनी करावे असे आवाहन मंगल कार्यालय चे संचालक दामुअण्णा महाराज शिंगणे यांनी केले आहे.