महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : युवा सेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे व युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या आदेशाने युवासेना कार्यकारणी सदस्य रुपेश दादा कदम आणि युवा सेना जिल्हा विस्तारक नित्यानंद त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख सरसेनापती स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त येथील युवासैनिकांकडून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि युवासेना जिल्हाप्रमुख हर्षल शिंदे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून एका गरजू व्यक्तीची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक मदत केली. युवा सेना जिल्हाप्रमुख हर्षल शिंदे यांना त्यांचे सहकारी युवा सेना उपशहर प्रमुख तथा युवा परिवर्तन ऑटो असोशिएशनचे अध्यक्ष कल्याण मंडल यांनी भाऊराव राजूरकर यांना मोतीबिंदू आहे. त्यांचे डोळे निकामी होण्याची शक्यता आहे. ही बाब हर्षल शिंदे यांना माहीत होताच त्यांनी आपल्या जन्मदिवसाचे सगळे कार्यक्रम रद्द करून त्यांच्या शस्त्रक्रियेचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला. मागील दोन वर्षात कोरोना मुळे कित्येक लोकांचे उद्योगधंदे बुडाले. काहींची नोकरी गेली. कितीतरी लोकांचे बळी गेले. लोकांची आर्थिक परिस्थिती खराब झाली. जन्मदिवसावर अवाढव्य खर्च करण्यापेक्षा आपला जन्म दिवस सार्थकी लागला पाहिजे.आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाला काही तरी देणे लागतो या भावनेतून आजूबाजूला असणाऱ्या गरजू लोकांना मदत करावी असा संदेश युवा सेना जिल्हाप्रमुख हर्षल शिंदे यांनी युवकांना दिला.