अकोला दि.22 : आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 792 अहवाल प्राप्त झाले. त्यात 358 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच खाजगी लॅब मधून 53 असे एकूण 411 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. 247 जणांना डिस्चार्ज देण्यात आले, तर एकाचा मृत्यूची नोंद झाली, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
दरम्यान काल (दि.21) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 18 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 61979(46577+14790+612) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 358 व खाजगी 53) 411 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 18 = एकूण पॉझिटीव्ह 429.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 356065 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 352067 फेरतपासणीचे 407 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3591 नमुने होते. आजपर्यंत एकूण 356065 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 309488 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आरटीपीसीआर 411 पॉझिटीव्ह
आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात 358 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात 143 महिला व 215 पुरुष रुग्ण आहेत. त्यातील 202 जण हे अकोला शहरातील, अकोला ग्रामीण येथील सात, मुर्तिजापूर येथील 51, बार्शीटाकळी येथील 10, पातूर येथील नऊ, बाळापूर येथील 15, अकोट येथील 18, तेल्हारा येथील 46 जण रहिवासी आहे. खाजगी लॅबच्या अहवालात 53 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असे एकूण 411 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
247 जणांना डिस्चार्ज
आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून 247 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
एकाचा मृत्यू
दरम्यान काल एकाचा मृत्यूची नोंद झाली. त्यात शैलार फैल शिवाजी पार्क, अकोला येथील 65 वर्षीय महिला असून या महिला रुग्णास दि.20 जानेवारी रोजी दाखल केले होते. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
2472 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 61979(46577+14790+612) आहे. त्यात 1148 मृत झाले आहेत. तर 58359 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 2472 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 390 चाचण्यात 18 पॉझिटीव्ह
कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.21) दिवसभरात झालेल्या 390 चाचण्या झाल्या त्यात 18 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात अकोला ग्रामीण येथे आठ, बाळापूर येथे पाच, अकोला महानगर पालिका क्षेत्रात 187 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तर अकोट येथे 44 चाचण्यात दोन, जिल्हा आरोग्य कर्मचारी 70 चाचण्यात सात, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 55 चाचण्यात चार, हेडगेवार लॅब येथे 21 चाचण्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे एकूण 390 चाचण्यात 18 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.