महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.२२:-भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा धडाडीचे युवा सामाजिक कार्यकर्ते करण संजय देवतळे यांची नुकतीच भारतीय जनता युवा मोर्चाच्या राज्य सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केली. त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.