भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन समिती ची मागणी.
राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली : जिल्हा अतिशय मागासलेला असून विकासापासून कोसो दूर आहे. या जिल्ह्यात कारखानदारी नसल्यामुळे जिल्ह्यातील अनेक बेरोजगार युवक युवती उच्च शिक्षण घेऊनही त्यांना नोकरी मिळत नसल्याने ते नोकरीच्या शोधात फिरकत असून त्यांना रोजगार मिळणे गरजेचे आहे.
यापूर्वी बाहेरील जिल्ह्यातील अनेक युवकांनी गडचिरोली जिल्ह्यातील पद भरतीत पोलीस, वन विभाग, महसूल आरोग्य व अन्य विभागात सरकारी नोकरी बडकावली यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील, पात्र असलेल्या उमेदवारावर फार मोठा अन्याय नोकरी करिता झालेला आहे.
तेव्हा गडचिरोली जिल्ह्यात तात्काळ नोकरी भरती राबवून गडचिरोली जिल्हा स्वतंत्र निवड मंडळ स्थापन करावे व याच जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना प्राधान्य देऊन पोलिस वनरक्षक, ग्रामसेवक, तलाठी, लिपिक, शिक्षक, आरोग्य कर्मचारी यासारखे पोलीस, वने महसूल आरोग्य, जिल्हा परिषद व अन्य सर्व विभागातील आवश्यक पदभरतीची पदे तात्काळ मंजूर करून गडचिरोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना योग्य न्याय देण्यात यावा याकरिता भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन गडचिरोली जिल्हा शाखेच्या माध्यमातून गडचिरोलीच्या जिल्हा भरातील सुशिक्षित बेरोजगार युवक व्यक्तींची रास्त मागणी आहे याकडे प्राधान्याने लक्ष देऊन गडचिरोली जिल्ह्यातील क, व ड च्या सरकारी नोकर भरती करिता गडचिरोली जिल्हा स्वतंत्र निवड मंडळ स्थापन करावे करिता सेवेची निवेदन सादर करण्यात आले.