धानोरा व चामोर्शी तालुक्यात आढळले दोन रूग्ण.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली:- जिल्ह्यातुन 30 डिसेंबर रोजी पाठविलेल्या ओमायक्राँन संशयित नमुन्यामध्ये 2 नमुने पाझिटिव्ह निघाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.जिल्ह्यात या नव्या कोरोना व्हायरसचे रूग्ण आढळल्याची पहीलीच वेळ आहे.यातील पहीला नमुना 7 डिसेंबर 2021 रोजी घेतलेला तर दुसरा नमुना 28 डिसेंबर 2021 रोजी घेण्यात आला होता.दर महीन्याच्या 30 तारखेला पुणे येथुन दिल्लीला विविध जिल्ह्यातुन निवडक नमुने तपासणी साठी पाठविले जातात.गडचिरोली जिल्ह्यातील तपासणीचा अहवाल दि.10 जानेवारी ला जाहीर करण्यात आले.त्यापैकी दोन नमुने ओमायक्रान पाझिटिव्ह असल्याचे आढळुन आले.या दरम्यान जिल्ह्यात 313 जणांचे कोरोना तपासण्या करण्यात आले.त्यातुन 22 नविन कोरोना बाधितांची भर पडली आहे.शिवाय 3 जणांची कोरोनावर मात केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली.सध्या सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 166 झाली आहे.नविन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यात 18,चामोर्शी तालुक्यात 1 आणी वडसा तालुक्यात 3 जणांचा समावेश आहे.कोरोना मुक्त झालेल्या 3 रूग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 1,अहेरी तालुक्यातील 2 जणांचा समावेश आहे.जिल्ह्यात कोरोना वँक्सीनचे पहिले डोस न घेतलेले 1लाख 29 हजार 738 जण बाकी आहेत.जिल्हात आढळलेले ओमायक्रान पाझिटिव असलेले रूग्ण सध्या ठणठणीत असुन त्यापेकी चामोर्शी तालुक्यातील रूग्ण बरा होऊन घरी परतला असुन दुसरा रूग्ण धानोरा येथील सिआरपीएप जवान असुन सध्या त्याची प्रक्रुती बरी असल्याचे माहीती आरोग्य विभागाने कळविले आहे.