अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पातूर शाखेत ब्रह्मा कुमारीज मीडिया विभागाच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील पत्रकार बांधवांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रह्माकुमारीज पातूर सेवा केंद्राच्या संचालिका आदरणीय राजयोगिनी ब्रह्माकुमारी लीना दिदी तर प्रमुख मार्गदर्शक प्रा.रवि अंभोरे पत्रकार रिसोड, तर प्रमुख अतिथी दिलीपभाऊ गिऱ्हे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नारायणराव अंधारे, विरपिता श्री निमकंडे, संगीताताई इंगळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ईश्वराच्या स्मरणाने व दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.उपस्थित पत्रकार बांधवांना ब्रह्माकुमारीज विद्यालयाचा परिचय ब्रह्माकुमार अविनाश यांनी करून दिला. यानंतर उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचा ब्रह्माकुमारी लीना दीदी व मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. प्रा. रवि अंभोरे यांनी मार्गदर्शन करतांना ब्रह्माकुमारीज मीडिया विंग चा उद्देश स्पष्ट केला. मीडिया हा समाजाला सकारात्मक दिशा देणारे प्रभावी माध्यम आहे त्यासाठी पत्रकार मानसिक व आध्यात्मिक दृष्ट्या सक्षम असावा यासाठी ब्रह्माकुमारीज विद्यालय मीडिया प्रभाग विविध उपक्रमाद्वारे प्रबोधन करीत असते. विद्यालयाच्या संचालिका ब्रह्माकुमारी लीना दीदींनी मनोगत व्यक्त करताना पत्रकार हा सकारात्मक समाज निर्मितीसाठी महत्वपूर्ण जबाबदार घटक आहे.वेळेनुसार समाजात अनेक बदल घडून येतात समाज हा सातत्याने परिवर्तनशील आहे परंतु समाजात होणारा बदल हा मीडियाच्या भूमिकेवर अवलंबून असतो म्हणून मीडियाने समाजात सकारात्मक विचारांचे बीजारोपण करून सशक्त समाज घडवण्यासाठी मानवी मूल्यांच्या विकासाला प्राधान्य द्यावे असे सांगितले. ब्रह्माकुमारीज विद्यालयाचा मीडिया विभाग हा पत्रकारांच्या चांगल्या जीवनशैली सह दैवी गुण व सकारात्मक दृष्टिकोन व सामाजिक सदभावना वृद्धिंगत करण्यासाठी विविध उपक्रमाद्वारे प्रयत्नशील आहे. तसेच ब्रह्माकुमारी लीना दीदींनी सर्व पत्रकारांना नवीन वर्षाच्या व पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या व सर्व पत्रकारांनी जीवनात सकारात्मक दृष्टीकोन अवलंबून ब्रह्माकुमारीज च्या कार्यात सहयोगी होण्याचे आवाहन केले. सहसंचालिका ब्रह्माकुमारी प्रभा दिदी यांनी उपस्थितांना राजयोग मेडिटेशन चे प्रात्यक्षिक करून राजयोगाविषयी अवगत केले. या प्रसंगी देवानंद गहिले, राजाराम देवकर, विजय सरदार, संजय गोतरकर, प्रदीप काळपांडे, दिलीप गिऱ्हे, श्रीकृष्ण शेगोकार, नामदेव जाधव, संगीता इंगळे, सैय्यद हसन बाबू, मोहन जोशी, सतीश सरोदे, स्वप्नील सुरवाडे, साजिद हुसेन, रमेश निलखन, नारायण अंधारे, निशांत गवई, अविनाश पोहरे, राम वाढी, अन्वर खान, निखिल इंगळे, अविनाश गवई, कढोणे इत्यादी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. सत्काराबद्दल पत्रकार संगीताताई इंगळे व देवानंद गहिले यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ब्रह्माकुमार प्रा.अतुल विखे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या सर्व ज्ञानार्थीनी विशेष परिश्रम घेतले.