राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
सिरोंचा : या गावात टायगर ग्रुप तर्फे भव्य व्हॉलीबॉल सामान्यांचे आयोजन करण्यात करण्यात आलेले होते. सामन्यांची सुरुवात ६ तारिखे पासून सुरु झालेत तर ८ तारिखेला अंतिम सामना व बक्षिस वितरण कार्यक्रम करण्यात आले. या सामन्यात जवळ पास २५-३० संघाचा सहभाग होता त्यात अहेरी तालुक्यातील संघ, तेलंगणाचे संघ , सिरोंचा असरअली, इत्यादी बाहेरील संघांचा समावेश होता. प्रथम पुरस्कार SNY – तेलंगणाचा संघ ठरला. ११,१११/- रु. संदिप कोरेत प्रदेश सदस्य आदिवासी आघाडी महाराष्ट्र राज्य, यांच्या कडून तसेच शिल्ड मधुकर परपटलावार यांच्या तर्फे दिला गेला. व्दितीय पुरस्कार ६,६६६/- मधुकरजी मडावी माजी जि.प. सदस्य, यांच्या कडून तसेच शिल्ड गोल्डन सीसी कोटापल्ली तर्फे स्व. समय्या सुंकरी यांच्या स्मृती प्रित्यात देण्यात आले आणि दृतिय विजेते टायगर्स स्पोर्ट्स क्लब नरसिंहापल्ली संघ ठरला. तृतीय पुरस्कार ३,३३३/- रु. टायगर ग्रुप नरसिंहापल्ली विभाग तर्फे देण्यात आले तसेच शिल्ड स्व. लक्ष्मण तोटावर यांच्या स्मृती प्रित्यर्थ रमेश तोटावार यांच्या कडून देण्यात आले. आणि विजेता संघ ठरला लंकाचेन टायगर्स. सदर बक्षिस वितरण कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष म्हणून संदीप कोरेत, व मधुकरजी मडावी हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अमित बेजजलवार, भास्कर मिसरी, मधुकरजी परपटलावार, टायगर ग्रुप मार्गदर्शक गुरुजी अज्जु गोल्डन सीसी कोटापल्ली, गोपी, रमेश तोटावर, राकेश बिरदू, मुतय्याजी अग्गुवार, इत्यादी मान्यवर तसेच टायगर ग्रुप नरसिंहापल्ली विभागच सदस्य व गावकरी उपस्थित होते.