उप पोलीस स्टेशन पेरमिली येथे पञकार दिनानिमित्य कार्यक्रमाचे आयोजन
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली : 06 जाने बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला. जातो याचे औचित्य साधून पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख,अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून जनसेवेसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती अतिदुर्गम भागात पोचवण्यासाठी कार्य करणारे तसेच उत्कुष्ठ लेखनी करणारे विविध वृत्तपत्रांचे पत्रकार यांना उप पोलीस स्टेशन पेरमिली चे अधिकारी व अंमलदार यांनी शाल व श्रीफळ देवून सम्मान केला.गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागात लोकशाहीचा चौथ्या स्तंभाचे कार्य अव्यहतपणे करून लोकांच्या समस्या वृत्तपत्रातून निर्भिडपणे मांडण्याचे कार्य करणारे पत्रकारांच्या कार्याचा यथोचित सन्मान व्हावा याकिरता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यकमाचे सुरवातीला मान्यवरांचे हस्ते भगवान बिरसा मुंडा व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिआरपीएपचे पोलीस अधिकारी सुनिल कुमार,प्रभारी अधिकारी गंगाधर जाधव,पोलीस उपनिरिक्षक अजयकुमार राठोड,पेरमिली येथील जेष्ठ ग्रामिण पत्रकार डॉ. शंकर दुर्गे,पञकार आसिफखान पठाण,श्रीनिवास बंडमवार,अधिकारनामा चे उपजिल्हा प्रतिनिधी निलिमा बंडमवार उपस्थित होते.प्रास्ताविक करताना पेरमिलीचे पोलीस प्रभारी अधिकारी गंगाधर जाधव यांनी समाज बांधणीतील पत्रकारांचे महत्व सांगून वृतपत्रे ही समाज मनाचा आरसा असून स्वातंत्र्यपूर्व काळापासून आतापर्यंतच्या वृत्तपत्रांचा दैदिप्यमान इतिहासाचा उल्लेख केला.कार्यकमाचे प्रास्ताविक पोउपनि गंगाधर जाधव आभार पोलीस उप निरिक्षक अजय कुमार राठोड सुत्रसंचालन राकेश उरवते यांनी केले.कार्यक्रमास पोलीस स्टेशन चे सर्व अंमलदार व एसआरपीएफ चे जवान उपस्थीत होते.