जि.प.शाळेतील 200 विद्यार्थांना मास्कचे वितरण.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली : समाजप्रबोधन व समाजात सद्भावनेचा प्रसार करणारे मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून पेरमिली येथील जि.प.उच्च.प्रा.शाळेत साजरा करण्यात आले.यावेळी अध्यक्षस्थानी लोकमतचे जेष्ठ पत्रकार डाँ.शंकर दुर्गे,प्रमुख अतिथी पञकार निलीमा बंडमवार,सपना बंडमवार,प्रियंका ढोंगे,आकाश सेंगारपवार,श्रीनिवास बंडमवार हे होते.अध्यक्षांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आले.मान्यवरांनी आपआपले मनोगत व्यक्त केले.त्या नंतर शाळेतील 200 मुलामुलींना मास्कचे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाचे सुञसंचालन अजय थुल(शिक्षक)यांनी केले तर आभार प्रदर्शन आर. कुडमेथे( शिक्षका)यांनी केले.