महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती :दि. 7:- जि. प. उच्च प्राथमिक शाळा गुडगाव (वडे) येथे “जिजाऊ ते सावित्री, सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा” अभियाना अंतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांनी विविध उपक्रम दिनांक ३ जानेवारी २०२२ ते १२ जानेवारी २०२२ पर्यंत आयोजित केले आहे.आज आनंदनगरी या उपक्रमाअंतर्गत छंद जोपासतांना पुढील भविष्यातील कारकिर्दीला प्रेरणा देणाऱ्या बाबींचे प्रदर्शन असे आज भरविण्यात आले होते.या उपक्रमाअंतर्गत जि. प. उच्च प्राथमिक शाळा गुडगाव (वडे) येथील वर्ग १ ली ते ७ वी च्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी विविध कलात्मक वस्तू तसेच शिक्षकांनी शैक्षणिक साहित्य निर्मिती करून बनविलेल्या साहित्याचे प्रदर्शन लावण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध सुप्त कलागुणांना वाव मिळून पुढील आयुष्यात यशस्वी जीवनासाठी आवश्यक मुल्ये व संस्कार मुलांच्या मनावर बिंबवून, भविष्यातील एक यशस्वी नागरिक बनविणे हा उद्देश या उपक्रमाच्या माध्यमातून साध्य होतांना दिसत आहे.जिजाऊ आणि सावित्री या महान स्त्रियांच्या कर्तृत्वाचा व व्यक्तिमत्त्वाचा आदर्श घेऊन आजच्या मुला-मुलींनी आपल्या जीवनाची वाटचाल केल्यास, सक्षम स्वावलंबी आणि धाडसी समाज नक्कीच निर्माण होण्यास मदत होईल. त्यामुळे अगदी शालेय स्तरापासून विद्यार्थिनींना राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची तसेच कार्याची ओळख होण्याच्या दृष्टिकोनातून वरील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिजाऊ ते सावित्री हा केवळ विचार नाही तर जिजाऊ ते सावित्री हा स्त्री सन्मानाचा मार्ग आहे.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका प्राची हिवरकर, योगिता प्रविण चिमुरकर, राजू कुटेमाटे आणि समीर मते सर यांनी प्रयत्न केले.











