सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/पेरमिली : गडचिरोली जिल्ह्यातील अती दुर्गम भागात असलेले उप पोलीस स्टेशन पेरमिली अंतर्गत येणारे कोरेली(खुर्द) गावा मधील लोकांचा लसीकरण घेण्याविषयी असलेला संभ्रम दूर करण्यात पोलीस स्टेशन पेरमिलीचे अधिकारी यशस्वी झाले.पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे, व अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली दुर्गम भागातील नागरीकांचे लसिकरण मोहिम राबविण्यात आली.ओमिक्रॉन मुळे कोरोनाच्या तीसऱ्या लाटेचे संकेत मिळत असताना नागरीकामध्ये लसिकरण करून घेण्याविषयी अनेक संभ्रम होते.कोरेली(खुर्दे) गावातील लोक लसिकरण करून घेत नव्हते. याची माहिती घेवून आरोग्य केंद्र पेरमिली चे डॉ . ईशान तुरकर व डॉ. गणेश मडावी,भारती खोब्रागडे आरोग्य सेविका,बबन गौरकर आरोग्य सहायक, यांचे सहकार्याने त्यांची टिम सदर गावात बोलावून घेवून गावातील लोकांना कोरोना विषयी असलेल्या गैरसमजुती पूर्णपणे दुर केल्या आणि सर्वांचे लसिकरण करून घेण्यात आले.350 लोकवस्ती असलेल्या गावाचे 18 वर्षावरील सर्व लोकांचे लसिकरण पूर्ण झाले.लसिकरण मोहीम यशस्वी करण्याकरीता प्रभारी अधिकारी गंगाधर जाधव पोलीस उपनिरीक्षक अजय कुमार राठोड सीआरपीएफचे पोलीस निरिक्षक सुनिल कुमार व उप पोलीस स्टेशन चे सर्व अंमलदार एसआरपीएफ चे जवान तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांचे पथकाने अथक परिश्रम घेतले.











