किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला : ज्योतीबांचे विचार सावित्रीबाईंनी आत्मसात केले आणि त्याप्रमाणे त्यांनी आचरण करून समाजात रुजविले असे उद्गार प्राचार्य डॉ. रमेश अंधारे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त श्री सोमपुरी महाराज ज्येष्ठ नागरिक संघ शिर्ला यांनी आयोजित अभिवादन कार्यक्रमात काढले. अध्यक्षस्थानी नारायण अंधारे होते रामायणाचार्य महादेव महाराज निमकंडे यांनी यथोचित सूत्रसंचालन केले ह .भ .प राजू महाराज कोकाटे आणि रामकृष्ण खंडारे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात नारायण अंधारे यांनी आपली क्रांतीज्योती काव्य रचना सादर केली. प्रमुख उपस्थितांमध्ये गुलाबराव कोकाटे, वीरपिता काशीराम निमकंडे, निळकंठराव अंधारे, दामोदर अंधारे,, सुहास कोकाटे, श्रीकृष्ण रा.अंधारे, दयाराम निमकंडे, रामदास सावरकर, रमेश वरणकार, मनोहर सावंत, शिवदास तायडे, विनायक निलखन, डिगांबर अंधारे, आनंत अंधारे, अमोल अंधारे , गजानन अंधारे, अणि ग्रामस्थांची उपस्थिती होती पसायदाने कार्यक्रमाची सांगता झाली.