बुलडाणा : राज्य उत्पादन शुल्क विभागार्फत विभागीय उप आयुक्त मोहन वर्दे तसेच अधीक्षक श्रीमती भाग्यश्री प.जाधव यांचे मार्गदर्शनाखाली 1 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये एकूण 88 गुन्हे नोंदविण्यात आले असून 82 वारस गुन्हे, 6 बेवारस गुन्हे नोंदवुन 89 आरोपींना अटक करण्यात आली. तसेच 9 वाहनांसह एकुण 28 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्ह्यात 31 डिसेंबरच्या अनुषंगाने 29 डिसेंबर रोजी प्र. निरीक्षक एन. के मावळे, दुय्यम निरीक्षक आर. के फुसे, एस डी चव्हाण यांचे पथकाने शेंदला, ता. मेहकर येथील आरोपी इसम नामे संतोष सरदार यांचे राहते घरी दारूबंदी गुन्ह्याकामी छापा टाकला. त्याठिकाणी गोवा राज्य निर्मित व विक्रीसाठी असलेली, राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधीत असलेली विदेशी दारू ब्ल्यु 7 एक्स्ट्रा स्मुथ व्हिस्की या ब्रँण्डच्या 750 मिलीच्या 36 बाटल्या, राज्यातील मॅकडॉल क्रमांक 1 व्हिस्की या ब्रँण्डच्या जुन्या बाटल्यामध्ये भरलेल्या बनावटी विदेशी मद्याच्या 223 सिलबंद बाटल्या, मॅकडॉल व्हिस्कीचे बनावट नवीन 1540 बुचे व 424 रिकाम्या जुन्या बाटल्या व एक हिरो होंडा कंपनीची मोटार सायकल व आरोपीचे दोन मोबाईल असा एकूण 142815 रूपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी संतोष संपत सरदार ह. मु शेंदला ता. मेहकर व प्रमोद भुजंग सरदार रा. रामनगर, मेहकर यांना अटक करण्यात आली. त्यांचेविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65, 80, 81, 83, 90 व 108 नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या कार्यवाहीत जवान प्रदीप देशमुख, अमोल सुसरे, गणेश मोरे, प्रफुल्ल साखरे, शरद निकाळजे व महिला जवान सौ शारदा घोगरे सहभागी होते.
तसेच यापूर्वी 20 नोव्हेंबर रोजी दे. मही ते दे. राजा रस्त्यावरील हॉटेल निसर्ग धाब्यावर नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांमधील आरोपी अमोल तेजराव शिंगणे यांनी नशेमध्ये वाद घालून शिवीगाळ केल्याप्रकरणी सरकारी कामात अडथळा व सरकारी कर्मचारी यांना मारहाण केल्याप्रकरणी कालपावेतो एकूण 40 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यत आलेली आहे.
तसेच 27 डिसेंबर रोजी झालेल्या चिखली येथे मोठ्या स्वरूपातील बनावट मद्य व 29 डिसेंबर रोजी मेहकर येथील शेंदला या गावामध्ये गोवा राज्य निर्मित बनावट विदेशी मद्य पकडण्यात आले असून बनावट विदेशीा मद्याचा गुन्हे उघडकीस आल्याने जिल्ह्यात इतरत्र अशा प्रकारचे बनावट विदेशी मद्य वितरीत होण्याची दाट शक्यता आहे. तसेच बनावट मद्य सेवनामुळे यापूर्वी राज्यात मोठ्या प्रमाणावर जिवितहानी होऊन शेकडो लोकांचा मृत्यू झालेला आहे. तसेच बनावट मद्यामुळे गंभीर स्वरूपाचे आजार तसेच गंभीर स्वरूपाचे अपंगत्व येण्याची संभावना असते किंवा अन्य दुर्घटना होण्याची दाट संभावना आहे. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाचा मद्यसेवन परवाना प्राप्त करून केवळ शासनमान्य अबकारी मद्य विक्री अनुज्ञप्त्यांमधूनच मद्य खरेदी व सेवन करावे. त्याचप्रमाणे पोलीस पाटील, ग्रामसेवक, सरपंच यांनी बनावट मद्य निर्मिती, वाहतुक, विक्री होत असल्यास या विभागास टोल फ्री क्रमांक 1800833333 वर किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 8422001133 वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या विभागाचे पोर्टलवर तात्काळ माहिती कळवावी, असे आवाहन अधिक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांनी केले आहे.