सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
अहेरी : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाच्या निषेधार्थ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या लाखो कर्मचाऱ्यांनी गुरुवारी 16 व 17 डिसेंबर या दोन दिवसीय संपाला सुरूवात केली.यामुळे जिल्हाभरातील बँकांच्या कामकाजावर परिणाम दिसुन आले आहे.त्यामुळे अहेरी क्षेत्रातील अतिदुर्गम भागातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला.यावेळी संपामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र अहेरी,आलापल्ली व पेरमिली तसेच बँक ऑफ इंडिया अहेरी व आलापल्लीचे सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन निषेध दर्शविला आहे.यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे विलोब रामटेके,गुणवंत रामटेके,रजनीकांत कुमार,अंकुल वारके,सुरेंद्र प्रसाद,प्रमोद भालावी, दिलीप खोब्रागडे,विपुल झा,चंद्रा सिंगर,मनिष वर्मा,हमीद कुरेशी आदी उपस्थित होते.