किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : स्थानिक तुळसाबाई कावल विद्यालय पातुर येथे इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना साठी व्यवसाय मार्गदर्शन शाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन करण्याकरिता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अकोला यांच्या मार्फत समुपदेशन करण्यात आले.
या कार्यशाळेत विद्यालयातील 352 विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्वक प्रतिसाद देत मार्गदर्शकाच्या प्रश्नाला उत्तरे देत सर्व शंकांचे समाधान करण्यात आले. कार्यशाळेमध्ये इयत्ता दहावी व बारावी नंतर पुढे काय?, ताणतणावाचे व्यवस्थापन, परीक्षेची तयारी, विद्यार्थ्यांचे मानसिक सक्षमीकरण, विद्यार्थ्यांच्या आवडी आणि क्षमता नुसार करिअरच्या संधी,आणी किशोरवयीन मुलांच्या समस्या इत्यादी विषयांबाबत सखोल माहिती देण्यात आली. कार्यशाळेला मार्गदर्शन करण्याकरिता हेमंत पद्मने सर समुपदेशक डायटअकोला, नीता जाधव जिल्हा समुपदेशक डायटअकोला, आणि आरती धोटे साधन व्यक्ती पातुर उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्राचार्य एस बी ठाकरे, अंशुमानसिंह गहिलोत ,जगमोहनसिंह गहिलोत, अजीतसिंह गहिलोत, आर एस ढेंगे करियर मार्गदर्शिका उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन इयत्ता दहावीची विद्यार्थिनीअनघा भराडी आणि आभार प्रदर्शन पल्लवी राठोड यांनी उत्कृष्टरित्या सादर केले व सर्वांचे लक्ष वेधीत केले.