किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : न्यायालयाच्या आदेशानुसार पातुर नगरपरिषद मधील मिलिंदनगर येथील दलित वस्तीचा काही रहिवासी भाग शिर्ला ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट करण्यात आला.येथील रहिवासी नागरिकांनी आपला रहिवासी भाग शिर्ला ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट न करण्यासाठी शासन दरबारी हरकती नोंदविल्यानंतर सुद्धा मागील काही वर्षांपासून हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने येथील रहिवासी नागरिकांच्या घरांचे मुल्यांकन व याविषयी पत्र व्यवहार न करता,ग्रामपंचायत च्या कुठल्याही स्वरूपाची सुविधा न पुरविता तसेच शासन नियमाप्रमाणे हरकती नोंदविण्याचा कुठलाही कार्यक्रम न आखता फक्त कर वसुली साठी कसलीही पुर्व सुचना न देता एकदम लोक न्यायालयाच्या नोटीसद्वारे नगरपरिषद आकारत असलेल्या कराच्या चार पट कर आकारणी करून ते भरण्यासाठी ग्रामपंचायत ने तगादा लावला आहे.येथील रहिवासी आतापर्यंत कधीही न्यायालयात न गेल्याने त्यांना थेट लोक न्यायालयाची नोटीस बजावण्यात आल्याने त्यांनी ग्रामपंचायत वर आपला तीव्र रोष व्यक्त केला आहे. संबंधित रहिवासी नागरिकांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पातुर तालुका विकास मंचाकडे धाव घेऊन त्यांना उचीत न्याय मिळवून देण्यासाठी विनंती केली आहे. पातुर तालुका विकास मंचाचे संयोजक ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांनी क्षणाचाही विलंब न करता ग्रामविकास अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला परंतु त्यांनी समाधानकारक माहिती न देता ते रजेवर असण्याचे कारण समोर केले.त्यावर ठाकूर यांनी तहसील कार्यालय येथे संबंधित रहिवासी समवेत तहसीलदार दिपक बाजड यांच्याशी बैठकीचे आयोजन करून यासंदर्भात बातचीत केली.त्यावेळी तहसीलदार यांनी ग्रामपंचायत चा हा विषय त्यांच्या अख्तारीत येत नसल्याने त्यांनी पातुर पंचायत समितीचे बीडीओ राहूल शेळके आणी शिर्ला ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी राहूल उंदरे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून याविषयी विचारणा केली आणी यावर लवकरात लवकर मार्ग काढण्यासाठी बैठकीचे आयोजन करून संबंधित रहिवासी यांच्या हरकतींची नोंद घेऊन त्यावर नियमानुसार योग्य मार्ग काढत अवाजवी पणे आकारण्यात आलेल्या करातून येथील रहिवासी नागरिकांना दिलासा द्यावा अशा सुचना केल्या आहेत. मिलिंद नगर येथील संबंधित रहिवासी यांनी तहसीलदार यांना त्या स्वरूपाचे निवेदन सादर केले आहे.या निवेदनाची दखल घेऊन योग्य कार्यवाही न झाल्यास दलित वस्तीतील रहिवासी नागरिकांच्या सोबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पातुर तालुका विकास मंचाचे संयोजक ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांनी यावेळी दिला आहे. याप्रसंगी बैठकीत तहसीलदार दिपक बाजड,नायब तहसीलदार सैय्यद अहसानोद्दीन,पातुर तालुका विकास मंचाचे संयोजक ठाकूर शिवकुमारसिंह बायस,किरणकुमार निमकंडे,रूस्तम गवई,बळीराम खंडारे,प्रल्हाद गवई,विजय राऊत,प्रमोद श्रीनाथ,श्रीकृष्ण गवई,लिलाबाई गवई,दगडू गवई,मधूकर इंगळे,विष्णू सरदार,गोपाल सरदार,अर्जुन गवई,विवेकानंद बागडे,काशीनाथ गवई,हर्षवती गवई,प्रमिला येलकर,व इतर रहिवासी उपस्थित होते.