अकोला, दि.१७ – समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त अनुसूचित जातीच्या मुलामुलींच्या शासकीय निवासी शाळांकरीता कंत्राटी पद्धतीने तासिका तत्वावर नेमणूक करावयची आहे. त्यासाठी गुरुवार दि. २३ डिसेंबरपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.
समाज कल्याण विभागाअंतर्गत असलेले अनुसुचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा, गोरेगाव ता.अकोला, अनुसुचित जाती मुलींची निवासी शाळा शेळद ता.बाळापुर जि.अकोला, अनुसुचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा, पाटसुल व अनुसुचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा शेलुवेताळ, ता.मुर्तीजापुर, जि.अकोला या चार निवासी शाळेकरता शिक्षकांची नेमणुक करावयाची आहे. याकरीता एचएससी., डि. एड, बी.ए, बी.एसस्सी, बी.एड, एम.एड पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवारांनी मुळ कागदपत्रांसह अर्ज व प्रत्यक्ष मुलाखती करीता गुरुवार दि. २३ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, जिल्हाधिकारी कार्यालय परीसर येथे व्यक्तीशः आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहावे. शिक्षकाची नेमणुक फक्त शैक्षणीक सत्र २०२१-२२ या सत्राकरीता तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने राहील. याबाबत सेवेत कायम करण्याचा कोणताही दावा ग्राह्य होणार नाही असे बंधपत्र उमेदवारांना द्यावे लागेल. तसेच तासिका तत्वावर मानधन शासन निर्णयानुसार देण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. यापुर्वी शासकीय निवासी शाळांवर कामाचा अनुभव व शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.