मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी हिवरखेड
हिवरखेड : पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ग्राम दानापूर येथे गावरान हटभट्टीची दारू गाळत असताना दोन वेगवेगळ्या रेड करून आरोपींसह मुद्देमाल जप्त केल्याची कार्यवाही हिवरखेड पोलिसांनि केली. त्यामध्ये आरोपी नामे नागोराव ओंकार उन्हाळे वय 52 वर्ष राहणार दानापूर याचे जवळून 15 लिटर गावठी हटभट्टीची दारू किंमत 1500 रुपये सडवा मोहमा 135 किलो किंमत 13500 रुपये २ नरसाळा,एक स्टील गुंड किंमत 230 रुपये असा एकूण15230 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध अपराध क्रमांक 385/21कलम 65 क ड ई फ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा नोंद केला तसेच शेख फिरोज शेख बशीर वय 42 वर्ष राहणार दानापूर याचे जवळून 05 लिटर गावठी हटभट्टीची दारू किंमत 500 रुपये सडवा मोहमाच 125 किलो किंमत 12500 रुपये १ नरसाळा जर्मन तौली किंमत130 रुपये असा एकूण 13130 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्याविरुद्ध अपराध क्रमांक 386/21कलम 65 क ड ई फ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा नोंद केला असून दोन्ही आरोपी कडून एकूण 28360 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. सदर कार्यवाही ठाणेदार धीरज चव्हाण यांच्यासह पो.कॉ. प्रफुल पवार, प्रदीप तायडे, शेख अनवर यांनी केली असल्याची माहिती पोलीस स्टेशन कडून मिळाली आहे.