अकोला, दि.12 – अनुकंपा तत्वावर आरोग्य विभागात तांत्रिक पदे भरण्यात येणार आहे. याकरीता प्रतिक्षासुचीतील उमेदवारांचे शैक्षणिक पात्रतेची माहिती अद्यावत नसल्याने अनुकंपा उमेदवारांनी अद्यावत शैक्षणीक किंवा तांत्रिक पात्रतेच्या कागदपत्रांच्या छायाप्रतिसह सोमवारी(दि.13) जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले आहे.
अनुकंपा तत्वावरील गट क वर्गातील 132 पदे तर गट ड वर्गातील 79 पदाची यादी यापुर्वी प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये शैक्षणिक पात्रता ही अर्ज केली त्यावेळची असल्याने शैक्षणिक पात्रता अद्यावत करणे आवश्यक आहे. अनुकंपाधारक लाभार्थ्यांनी अद्यावत शैक्षणिक किंवा तांत्रिक पात्रतेच्या कागदपत्रे लोकशाही सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे सोमवार दि. 13 डिसेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता उपस्थित राहून सादर करावे. उपस्थित राहणे शक्य नसल्यास अशा उमेदवारांनी rdc_akola@rediffmail.com या ई-मेलवर सकाळी 11 वाजेपर्यंत पिडीएफ करुन सादर करावी.