गुरुवार पेठ भागात 100 टक्के लसीकरण पूर्ण
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर : पातूर येथे कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण शिबीरास ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
श्री. दत्त क्लिनिक व आयुर्वेद पंचकर्म केंद्र, विर शहीद आनंद काळपांडे मार्ग,गुरुवार पेठ व धर्मविर संघटना पातूर यांच्या सयुंक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य विभाग पातूर यांच्या सहकार्याने कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन दिनांक 6/12/2021रोजी कोविशिल्ड तसेच दि. 7/12/2021 रोजी कोव्हॅक्सींन कोविड-१९ पहिला व दुसऱ्या डोससाठी आयोजित करण्यात आले होते या शिबिरास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
कोरोना संकटाच्या व ओमायक्रॉन च्या लाटेच्या पाश्वभूमी वर कोरोना संकटापासून प्रत्येक नागरिकांनी सुरक्षित राहण्यासाठी तालुक्यातील ज्या नागरिकांनी लसीकरण केले नव्हते अशा नागरिकांना सदर शिबिरात लसीकरणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली.सदर शिबिरात गुरुवार पेठ भागातील नागरिकांचे पहिला 100 टक्के डोस व दुसरा 98 टक्के डोस पूर्ण झाले.
कार्यक्रमाचे आयोजन सचिन बारोकार(संस्थापक अध्यक्ष धर्मवीर संघटना) व डॉ.सचितानंद बोंबटकार यांनी केले असून कार्यक्रमाचे उदघाटन पातूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.चिराग रेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले,तर प्रमुख उपस्थितीत डॉ कैलास डाखोरे,डॉ.नदीम सर,डॉ.विलास इंगोले,रेखा सपकाळ,सुनीता राठोड,श्रीमती हर्षा खडसे,कु भारती सुरवाडे,नितीन जाधव,निरंजन बोबंटकार, प्रकाश निमकंडे ,प्रल्हाद निलखन,प्रशांत बंड, गणेश करंगळे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन बारोकार यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.सचिन बोबंटकार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कन्हैय्या चिंचोळकर,पप्पू सातव,प्रज्वल भाजीपाले ,शुभम निमकंडे ,निखिल इंगळे,अजय बगाडे,रवी ढगे,सनद गवई,संचित काळपांडे,आदित्य इंगळे,पवन येनकर, आरोग्य विभाग पातूर यांचे सहकार्य लाभले.


