अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर : येथे राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरीनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन पातुर तालुका प्रतिनिधी राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीम सैनिक ग्रुप त्रिरत्न नगर संभाजी चौक संपन्न झालेल्या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले आहे. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मेणबत्ती ज्योत पेटवून पुष्पमाला अर्पण करून डॉक्टर बाबासाहेबांना यावेळी पूजन करून अभिवादन करण्यात आले यासोबतच बुद्धमूर्ती चे सुद्धा पूजन करण्यात आले.यावेळी एकलव्य म्युझिक ल ग्रुप पातूर च्या वतीने गीत गायन करून अभिवादन करण्यात आले यावेळी परिसरातील नागरिक कोविड नियमांचे पालन करून उपस्थित होते.