गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:-स्थानिक तेल्हारा शहरांमधील मिलिंद नगर मध्ये कार्यरत असणाऱ्या मिलिंद मिलिंद मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून त्यांना आगळी-वेगळी आदरांजली व्यक्त करण्यासाठी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी covid-19 चे सर्व नियम पाळून अठरा तास अभ्यास अभियानाची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी विचारपीठावर स्थानिक नगरसेवक दिलीप पिवाल हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये भिमराव परघरमोल व्याख्याता तथा अभ्यासात फुले-आंबेडकरी विचारधारा तेल्हारा शृंगारकर सर स्पर्धा परीक्षा अकॅडमी तेल्हारा जयश्रीताई फुंडकर नगराध्यक्षा तेल्हारा श्रीकृष्ण तायडे, देवराव दामोदर,अशोक दारोकार, विकास पवार हे होते.
भिमराव परघरमोल हे विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरे अभिवादन करायचे असेल तर त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी फक्त अठरा तास अभ्यास करून चालणार नाही तर निरंतर अभ्यास करून आपले ध्येय गाठले तरच त्यांना खरे अभिवादन ठरेल. शृंगारकर सर म्हणाले की, आज जरी आम्ही आमच्या वडिलांच्या नावाने ओळखले जात असलो तरी अभ्यासाने उच्च स्थान गाठून ते आपल्या नावाने ओळखले गेले तर त्यांची मान उंचावेल,असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील तायडे यांनी केले तर आभार प्रदर्शन देवराव दामोदर सेवानिवृत्त पोलीस कॉन्स्टेबल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मिलिंद मंडळाचे अध्यक्ष अनिल तायडे तथा सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात प्रयत्न केले.