किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
सामान्य नागरिकांच्या जनकल्याणकारी मुलभूत सुविधा मिळविण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा.
पातूर तालुका विकास मंच संयोजक
ठाकूर शिवकुमारसिंह बायस
पातुर शहरातील सर्व सामान्य नागरिकांना शासनाच्या माध्यमातून मिळणा-या मुलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी पातुर तालुका विकास मंचाचे संयोजक ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांनी शासन दरबारी विविध मागण्या पुर्ण व्हाव्या म्हणून लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाचा पर्याय निवडला आहे.
संविधान दिनाच्या दिवशी २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस जवानांना विनम्र अभिवादन करून या उपोषणाला सुरुवात करण्यात आली.
जनसामान्य नागरिकांच्या असलेल्या लोक कल्याणकारी मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.
पातुर तालुक्यातील शिर्ला ग्रामपंचायत मधील देशासाठी प्राणार्पण करणा-या शहिद कैलास निमकंडे यांच्या परिवाराला मंजूर करण्यात आलेल्या ५ एकर भुखंडाचा ७/१२ त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे तात्काळ करण्यात यावा,
पातुर नगरपरिषद मार्फत महाराष्ट्र शासनाने राबविलेली सुजल निर्मल जल योजना तात्काळ पुर्ण करण्यात यावी. ८/९ वर्षापासून सुरू करण्यात आलेली योजना मुदतीत पुर्ण न करण्यास जबाबदार असणाऱ्या मुख्याधिकारी यांच्यावर निलंबनाची कठोर कार्यवाही करण्यात यावी.तसेच संबंधित ठेकेदारावर कायदेशीर दंडात्मक कार्यवाही करून त्याचा परवाना रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावे.
नैसर्गिक आपत्तीतून तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई तसेच मागील वर्षीचा न देण्यात आलेल्या पिक विमाची रक्कम तात्काळ देण्यात यावी.
पातुर शहर व तालुक्यातील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या घरकुलाचे निधी वाटप तात्काळ करण्यात यावे.तसेच ड गटातील बाद झालेल्या विकलांग नागरिकांचे घरकुलाचे प्रश्न तातडीने मार्गी लावावा.
पातुर नगरपरिषद मध्ये स्थायी स्वरूपात अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक तात्काळ करण्यात यावी.
नगरपरिषद हद्दीतील नदीवरील पुलांची दुरावस्था झाली आहे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाय योजना करण्यात याव्या.
शहरातील सुवर्णा नदीचे खोलीकरण व रूंदीकरण करण्यात यावे.
पातुर नगरपरिषद व ग्रामपंचायत मार्फत पातुर ते बाळापूर मार्गावर केलेल्या डागडुजी बद्दल ताळेबंद तपशील सादर करावा.
शहरातील आवश्यक असलेल्या गरजु नागरिकांना नवीन नळ जोडणी तात्काळ देण्यात यावी.
पातुर शहरासाठी आरोग्य विभागाने मंजूर केलेल्या ग्रामीण आरोग्य रूग्णालयाची उभारणी तात्काळ करण्यात यावी.
पातुर शहरातील शेतकरी दिनकर देशमुख यांची नगरपरिषद पातुर ने बळकावलेली जमीन परत त्यांना देण्यात यावी.
पातुर नगरपरिषदने हिंदू स्मशानभुमीच्या आवंटीत केलेल्या जमीनीवर अग्निशामक दलाकरिता उभारलेल्या बिल्डींगच्या झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याकरिता चौकशी समिती नेमण्यात यावी.
तालुक्यातील रब्बी हंगाम पिकांसाठी विद्युत पुरवठा खंडित न करता सुरळीत ठेवावा.
ज्या शेतकऱ्यांनी बॅंकचे कर्ज काढले आहेत व ते त्यांचे हप्ते नियमित भरतात अशा शेतकऱ्यांना शासनाने मंजूर केलेल्या प्रोत्साहन पर अनुदान योजनेचा लाभ देण्यात यावा.
महाराष्ट्र राज्यातील सर्व तहसील कार्यालयात काम करणा-या कोतवाल पदाच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी.
एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र सरकारच्या शासकीय सेवेत सामावून घेणे.
पातुर तालुक्यातील माजी सैनिकांच्या नावाची यादी तहसील कार्यालयाच्या दर्शनी भागात लावणे.
तहसील कार्यालयात मिळणारे शासकीय दस्तावेज यांच्या शुल्काचे दरपत्रक कार्यालयात दर्शनी भागात लावणे.इत्यादी स्वरूपाच्या मागण्या तात्काळ पुर्ण करण्यात याव्या अशा स्वरूपाची मागण्या आहेत.