सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम
वाशिम -अनसिंग येथिल श्री प.दि. जैन कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने संविधान दिनानिमित्त मतदान नोंदणी, जागृती अभियान व सामाजिक सद्भावना जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्रा. डॉ. अनील जैन तर प्रमुख वक्ते म्हणून श्रेत्रीय समन्वयक डॉ. गजानन बनचरे हे उपस्थित होते. संविधान दिनाचे औचित्य साधून संत गाडगे बाबा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर डॉ. गजानन बनचरे यांनी मतदान जागृती व नोंदणीच्या संदर्भाने विद्यार्थ्यांनी सजग असले पाहिजे व आपली नोंदणी केली पाहिजे. सोबतच मजबूत लोकशाही साठी आपण मतदान योग्य आणि लायक व्यक्तीला जरूर केले पाहिजे असे आवाहन केले. यावेळी गणेश चिखलकर,नागेश केंद्रे, ऋषिकेश जोगदंड यांनीही भारताच्या उभारणीमध्ये आम्ही युवक म्हणून काय भूमिका बजावू शकतो यावर आपले भाष्य केले. डॉ.अनिल जैन यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना आपले लोकप्रतिनिधी आपण कसे निवडले पाहिजे, याबाबत आपण जबाबदार नागरिक म्हणून कसे जागरुक असले पाहिजे हे सांगितले. संविधान निर्मितीच्या प्रक्रियेतील डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका व संविधानामुळेच भारतीय एकात्मता व संघीय एकता कशी निर्माण होऊ शकली या संदर्भाने महत्त्वपूर्ण मनोगत व्यक्त केले. शिवाय लोकशाहीचे आधारस्तंभ म्हणून तरुणांनी जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कर्तव्यशील राहण्याचेही आवाहन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिदानंद बिचेवार यांनी ,संचालन व आभार ऋषिकेश जोगदंड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. पंकज शर्मा, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. वैशाली गोरे, राजश्रीताई वाळली, वृषभ महेशकर व सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.