अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातुर : तालुक्यातील सांगोळा या गावातील गोपाल राजाराम मानकर वय 45 वर्षे या युवकाने आत्महत्या केल्याने यांचे परिवारावर आर्थिक डोंगर कोसळला असताना या ठिकाणी अद्याप कुठल्याच प्रकारची मदत प्रशासकीय भेट पुढाऱ्यांची भेट या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला दिली नसल्याची माहिती मिळाली आहे.या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला प्रहार सेवक अमोल करवते विजय टाले, गणेश लहामगे, रामदास काकड, अनिल भवाने, संतोष इंगळे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी देऊन आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे सात्वन केले आहे.सातवं करीत असताना या कुटुंबाचे काय हालत स्पष्ट आहेत हे पाहण्याकरता कुठलाही प्रशासनाचा कर्मचारी अधिकारी पुढारी लोकप्रतिनिधी या ठिकाणी आले नसल्याची खंत उपस्थित लोकांनी यावेळी व्यक्त केली आहे आत्महत्या केलेल्या गोपाल मानकर यांचे पाठीमागे त्यांची पत्नी चंदाबाई दोन मुलं ज्ञानेश्वर 11 वर्ष ,गणेश 9 वर्ष, मुक्ता मुलगी 17 वर्ष असा परिवार असल्याने अखेर या कुटुंबाने आता काय करावे असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे अतिशय हलाखीची परिस्थिती आणि पती अपंग त्यातही त्यांनी आत्महत्या केली त्यामुळे या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यामुळे सदर महिलाही भावाच्या आश्रयाला गावातच आहे यावेळी प्रहार सेवक अमोल करवते व विजय टाले यांनी या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)