किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
देश की बात फाउंडेशन तर्फे देशभरात राष्ट्रीय रोजगार धोरणावर चर्चा सत्र आयोजित करण्यात येत आहेत. शनिवारी अकोला जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय रोजगार धोरणाच्या मसुद्यावर चर्चा आणि सूचनेसाठी रोजगार संवाद आयोजित करण्यात आला होता. रोजगार संवादामध्ये बेरोजगारी समाधान, राष्ट्रीय रोजगार धोरणातील मसुद्यावर चर्चा केल्या गेली. यावेळी दिल्लीहुन प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्रीय समन्वयक महेश सामंत तथा केंद्रीय सह-समन्वयक महेश चौधरी उपस्थित होते. यावेळी चर्चा आणि सूचनेसाठी लाईफ केअर मल्टिपर्पज फाऊंडेशन, नारीशक्ती सेवा फाऊंडेशन, SWAS टीम ऑफ अकोला पोलीस दल, महाराष्ट्र श्रम विकास परिषद अमरावती, प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन, आरोळी सामाजिक संघटना, माऊली बहुद्देशीय संस्था तीवळी (वाशीम), तथा सकारात्मक राष्ट्रवादाच्या समविचारी संस्था व संघटनांचे प्रतिनिधीं भाग घेऊन आपले विचार मांडले.
कार्यक्रमासाठी व्यवस्थापन व नियोजन जिल्हा समितीचे अमर कांबळे, राजू कांबळे, समाधान वानखडे, सुखदेव मदनकार, दीपक जाधव यांनी परिश्रम घेतले.
चौकट
बेरोजगारी साठी नवे धोरण बनेल
विदर्भ समन्वयक शुभम अंभोरे यांनी संघटनेचे ध्येय धोरण स्पष्ट करत येणाऱ्या काळात बेरोजगारीला घेऊन देशात नवे व्यवस्थित धोरण बनेल ज्यामध्ये बेरोजगारीच्या संकटाचा सामना केला जाईल असे मत मांडले.