एक दिवा आदिवासींच्या दारी
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
संस्कार प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून म्हणजे गेल्या १७ वर्षांपासून दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी भागात जाऊन तेथील बांधवा सोबत दिवाळी साजरी करण्याचे व्रत घेतलेले पुणे येथील डॉ. मोहन गायकवाड व त्यांची संस्कार प्रतिष्ठानची टीम या वर्षी अकोले तालुक्यातील अतिशय दुर्गम अश्या “फोपसंडी” या गावांतील सर्व आदिवासी बांधवांची दिवाळी गोड करण्यासाठी दिवाळीच्या आदल्या दिवशी दिवाळी फराळाचे साहित्य, आकाश कंदील , कपडे घेऊन गेले व या आदिवासी बांधवांची दिवाळी गोड केली. अकोले तालुक्यातील अतिदुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फोफसंडी गावात निर्सगसंपदा भरभरून असली तरी उत्पन्नाच्या साधनांची कमतरता असल्यामुळे अठरा विश्व दारिद्रय तेथे पाहायला मिळते. वाड्या वस्तीवरील व फोफसंडीचे सरपंच दत्तात्रय मुठे यांच्या सहकार्यामुळे या आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यास मदत झाली एकूण १७५ कुटुंबियास ३०० साडया,२२५ कि साखर,२२५ कि रवा २२५ कि मैदा,२५ ली.तेल २२५ साबण, १०० आकाश कंदील,१०० उटणे,१०० ड्रेस,५० लहान मुलांची कपडे, बिस्किट पुडे शॕम्पू तेल,आणि इतर साहित्य वाटप केली.त्यांच्या घरासमोर रांगोळी काढून पणत्या लाऊन दिवाळी साजरी केली. अहमदनगर जिल्ह्यातुन १० सभासद आणि पिंपरी चिंचवड शहरातुन ४० सभासद सहभागी झाले होते. संस्कार प्रतिष्ठान यांनी आतापर्यंत महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील आदिवासींसोबत दिवाळी साजरी केली आहे. त्यामध्ये गडचिरोलीतील नक्षलग्रस्त ” “भागात त्यांनी आतापर्यंत सलग पाच वेळा दिवाळी साजरी केली आहे. त्याचबरोबर इतर ठिकाणी ही त्यांनी दिवाळी साजरी केली आहे. या उपक्रमासाठी पराग कूंकूहोळ यांनी मदत केली आकाश कंदील कार्यक्रम यशस्वीतेसाठी नगर जिल्ह्यातील संस्थेचे सभासद मा. श्री.२ाजेंद्र फंड यांचे विशेष सहकार्य लाभले.
अशी माहिती संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेचे सक्रीय कार्यकर्ते तसेच पातुर तालुका विकास मंचाचे संयोजक ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांनी यावेळी दिली.











