समाधान पाटील तालुका प्रतिनिधी चिखली
चिखली : प्राप्त माहिती अशी की बुलढाणा चिखली मार्गावर वसलेल्या केळवद येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेवर मध्यरात्री दरोडा पडला ही घटना सकाळी 30 ऑक्टोंबर रोजी शिपाई बँकेत आल्यावर उघडकीस आला अंदाजे वीस लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी पळवली असे उघडकीस आले. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून श्वान पथकाद्वारे चोरट्याचा तपास लावत आहे. केळवद गावात किन्होळा रोडवर भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे त्याच्याच बाजूला हिरकणी पतसंस्था ही आहे, बाजूच्या खिडकीचे गज वाकवून दरोडेखोर बँकेत शिरले असे दिसून येत आहे, सकाळी जेव्हा शिपाई बँकेत आला तेव्हा त्याला खिडकीचे गज वाकलेले दिसले त्याला चोरीचा संशय आला त्याने लगेच बँकेच्या अधिकाऱ्यांना कळवले, अधिकाऱ्यांनी बँकेत येऊन पाहणी केली व लगेच पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. बुलढाणा उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते, चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक लांडे, हे ही घटनास्थळी आले. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले श्वानाने बँकेच्या बाजूच्या शेतापर्यंत चोरट्याचा माग काढला तिथे दरोडेखोरांचे हॅन्ड ग्लोज व बॅटरी मिळून आली, सीसीटीव्ही मधे दरोडेखोर केद झाल्याची शक्यता आहे सीसीटीव्हीचे फुटेज तपासल्या जात आहे.











