गिता सोनोने तालुका प्रतिनिधी जळगांव जामोद
जळगांव जामोद : पोलिसांना एका गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार २९ आक्टोंबर च्या रात्री सुनगांव येथे एका पडक्या घरामध्ये एक्का बादशहा जुगार चालू असल्याच्या बातमी मुळे जळगांव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेषराव पाटील, नाईक पोलीस कॉन्स्टेबल अनिल सुशिर, नाईक पोलीस कॉन्स्टेबल शांतीलाल धिरबस्सी,समाधान टेकाडे,आशिष भारती यांनी पंचासमक्ष टाकलेल्या जुगारावरील धाडीत सदर ठिकाणी एक्काबादशहा नावाचा जुगार खेळणाऱ्या सुनगांव येथील २० आरोपींना जागीच पकडले त्यामध्ये आरोपी शुभम दुबे,अतुल ढगे, वसंता दामधर,शुभम राजपुत,संतोष कपले, विलास हिस्सल, विजय गवई,विठ्ठल येऊल, राहुल वानखडे, सुधाकर आंबेकर,गजानन वानखडे, शब्बीर तडवी, गणेश वसुले, त्रुशिकेष येऊल, संदिप ढगे,लखन मिरटकार,अमोल ताडे, दीनानाथ धुर्डे, दिनेश काळपांडे, योगेश ढगे वरील सर्व आरोपी सुनगांव येथील असुन त्याच्याकडुन नगदी ९१२० रूपये व ५२ तासपत्ते असा एकुण ९१५० रूपयांचा मुद्देमाल मिळुन आला.त्यामुळे सर्व २० आरोपी विरोधात जळगांव जामोद पोलिस स्टेशनला अप-नं८८६/२०२१ कलम.४,५ म.जु.का प्रमाणे कारवाई करण्यात आली असुन.आरोपींना पत्र देऊन सोडण्यात आले.सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे व पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपुत करीत आहेत.