सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
सिरोंचा : गडचिरोली जिल्हातील चामोर्शी व अहेरी तालुक्यात वाघ व बिबट्याच्या हल्याचे धुमाकुळ सुरू असुन यात अनेकांना प्राण गमवावे लागत आहे.त्यामुंळे या परिसरात अजुनही दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या तालुक्या बरोबर आता तेलंगाना व छत्तीसगड च्या सिमेला लागुन असलेले सिरोंचा तालुक्यातही बिबट्याने धुमाकुळ घातलेला असुन या परिसरात भितीचे वातावरण आहे.दि.28 आँक्टो रोजी सकाळी सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका या गावातील काही नागरिक जवळच्या जंगल परिसरात नेहमीप्रमाणे गुरे व बकरी चरायला नेले. त्या जंगलात दडुन बसलेला बिबट्याने अचानक पणे काही कळाच्या आत दुर्गम मल्लय्या वय 48 रा.पेंन्टीपाका या इसमावर जोरात हल्ला करून त्याला जागीच ठार केले. व त्याचे सोबत असलेला दुसरा व्यक्ती रमनेणी मुतेश रा. पेन्टीपाका हा बिबट्याच्या तावडीतुन सुटका करित गावाकडे धाव घेतली.या घटनेची माहीती रमनेनी मुतेश यांनी गावातील लोकांना व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.घटनेची माहिती मिळताच त्वरित गावातील नागरिक व वन अधिकाऱ्यांनी जंगल परिसरात बिबट्याने ठार केलेल्या दुर्गम मल्लय्या या व्यक्तीचा शोध घेतला.व वन विभागाच्या चमुने पंचनामा केला.यावेळी सिरोंचा वनपरिक्षेत्र अधिकारी कटकू, आर. व्ही. जवाजी, क्षेञ सहाय्यक डी. जी.बुरसे वनरक्षक, आत्राम वनरक्षक,एस टी.तुलावी पोलीस उपनिरीक्षक श्रीकिशन कांदे, ना.पो से.संतोष कांबळे, पो.सी प्रवीण तोर्रेम व सिरोंचा भाजप चे तालुका अध्यक्ष शंकर नरहरी,भाजपचे महामंत्री माधव कसर्लावार,सामाजिक कार्यकर्ता किरण वेमुला,पोलीस पाटील सडवली वेमुला,पानेम मलय्या,आर वेदांतम, मधुसूदन आरवेल्ली व गावातील नागरिक उपस्थित होते.मृत कुटुंबीयांना वन परिक्षेञ अधिकारी कटकू यांचे कडून 15 हजार रूपयाची आर्थिक मदत देण्यात आली.सिरोंचा वनविभाग कडुन नरभक्षक बिबट्या पासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून लवकरच या बद्दल उपाय शोधू असे वनपरिक्षेत्र अधिकारी कटकु यांनी जनतेला सांगितले.











