पातूर तालुका विद्यार्थी व युवक आघाडी तर्फे तहसीलदार यांना निवेदन
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी, अकोला
पातूर : राज्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा न करता दिवसरात्र जनतेची सुरक्षा करतात. तसेच कोरोना सारख्या आपत्ती काळात पोलिसांनी सुट्टी न घेता दिवस रात्र सेवा बजावून नागरिकांच्या जीवाचे रक्षण केले. सण उत्सव काळात कायदा व शांतता अबाधित ठेवण्यासाठी पोलिस अधिकारी, कर्मचारी नेहमी दक्ष असतात. काही वर्षांपूर्वी पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात येत असलेल्या दिवाळी बोनस हे सरकारने बंद केलेले आहे. राज्य शासनाचा हा निर्णय पोलिसांवर अन्याय करणारा असून रक्षणकर्त्या पोलिसांचा दिवाळी बोनस सरकारने पूर्ववत सुरु करावा.सामान्य गोरगरीब व अन्यायाविरोधात खाकी वर्दी पैराव घालून एक मनुष्य आपलं कर्तव्य बजावतो. पोलीस जनसामान्यातूनच जाणारा व्यक्ती असुन मागील काही वर्षात कोरोना काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या कर्तव्याची एकनिष्ठ राहून गरजूंना मदत करून समोर आलेल्या परिस्थितीशी लढा देत अनेक पोलिस दलातील कर्मचाऱ्यांनी आपला प्राण या काळामध्ये गमावला आहे.
अशा या कर्मचारी व अधिकाऱ्यांना त्यांच्या हक्काचे दिवाळी बोनस दिवाळीपूर्वी मिळण्याकरिता महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष रविभाऊ वैद्य आणि अकोला जिल्हाध्यक्ष निलेश किरतकार यांच्या सुचनेने पातूर तालुका कार्यकारिणीच्या वतीने पातुर तहसीलदार दिपक बाजड, नायब तहसीलदार सैय्यद ऐसानोद्दीन यांच्या माध्यमातून निवेदन दिले.
यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन विद्यार्थी आघाडीचे पातूर तालुका अध्यक्ष अर्जुनसिंह गहिलोत, उपाध्यक्ष अविनाश पोहरे, तुषार सिरसाट, तुषार शेवलकार, अतुल भांगे, राहुल वाघमारे, पंकज पोहरे, निखिल उपर्वट, राज पांडे, गौरव श्रीनाथ, सतिश कांबळे, निरज कुटे, अविनाश गवई, सुनिल गाडगे, प्रभुदास बोंबटकार इत्यादी उपस्थित होते.