गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:- आपण या समाजाचे घटक आहोत आणि प्रत्येक माणसांनी आपल्या परीने जी मदत करता येईल ती केली पाहीजे होवोत तुमची स्वप्ने साकार,अभ्यासाला द्या जीवनाचा आधार या संकल्पनेतुन आधारपर्व फाउंडेशनच्या अध्यक्षा यांनी आपली मुलगी हितेश्री गढे,पती विशाल गढे यांच्या वाढदिवसा निमित्त वायफात खर्च न करता तेल्हारा शहरातील साई मंदिर च्या बाजूला रोड च्या कडेला गावो गावी फिरणारे तांड्यातील परीवार हे कापडाचे तंबु टाकुन राहतात व ग्रामीण भागात फिरुन स्टोव्ह,कुकर,शेगडी दुरुस्ती करुन आपल्या परीवाराचा उदरनिर्वाह करताना परीस्थिती बिकट असल्यामुळे त्यांच्या मुलांना शिक्षणा पासुन वंचीत रहावे लागते त्यांची जाणीव लक्षात घेता फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रद्धा गढे यांनी मुलगी व पती यांच्या वाढदिवशी वर्षा पारसकर,मनीषा देशमुख,विशाल गढे, ओम देशमुख यांच्या समवेत ताड्यामधील मुलांना वही,पेन शालेय साहीत्य देऊन चिवळा व बिस्कीट वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला.जर आपला वाढदिवस असेल तर आपण घरात साजरा न करता
त्यावेळी पैशाचा खाऊ गरीब गरजुंच्या मुखात घालुन गरीबांच्या तोंडावर आपल्यामुळे आनंद बघता येईल असे आधारपर्व फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रद्धा गढे यांनी कळविले.