विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
किरणकुमार निमकंडे / जिल्हा प्रतिनिधी, अकोला
पातूर (दि. २५ ॲाक्टोबर २१)
स्थानिक डॅा. एच. एन.सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व आरोग्य विभाग पातूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॅा.किरण खंडारे यांच्या मार्गदर्शनखाली कोरोना लसीकरण केंद्राची सुरुवात झाली. दि. २५,२७, व २९ ॲाक्टोबर रोजी केंद्रामध्ये लसीकरण होईल आज जवळपास ८५ विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला. यासाठी डॅा. एच.एन.सिन्हा महाविद्यालयात शिकत असलेले सर्व विद्यार्थी त्याचे पालक नातेवाईक तसेचं पातुर मधील सर्व नागरीकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॅा. किरण खंडारे यांनी केले. लसीकरण केंद्राचे उद्घाटन दादाराव देशमुख, आजीवन सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी विचार मंचावर डॅा किरण खंडारे, डॅा.ममता इंगोले, प्रा. अतुल विखे, प्रा. विनायक वसू, डॅा.दिपाली घोगरे, डॅा.चिराग रेव्हाळे, डॅा. कैलास डाखोरे, डॅा. विलास इंगोले,उमेश ताठे, विशाल गव्हाळे,नितीन जाधव, डॅा.विजय जाधव, हर्षलता खडसे, कु.पल्लवी जाधव उपस्थीत होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य डॅा.किरण खंडारे यांनी सांगितले की, कोरोना सारख्या महामारी ला हद्दपार करायचे असेल तर आपल्या सर्वांना लस घेणे आवश्यक आहे. कारण त्या शिवाय आपण कोरोनाशी लढु शकणार नाही. आपल्या सर्वांनी एकत्र येवुन लढा देण्याची गरज आहे.असे प्रतिपादन केले. याप्रसंगी डॅा.एच.एन.सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या शाळा समीती वर नियुक्ती झाल्या बद्दल दादाराव देशमुख यांचा शाल व श्रीफळ देऊन महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.याप्रसंगी डॅा.विलास इंगोले, उमेश ताठे, विशाल गव्हाळे, नितीन जाधव, डॅा विजय जाधव, यांनी आपली मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमाचे उद्घाटक म्हनुन बोलतांना दादाराव देशमुख यांनी इतका छान आणि समाजोपयोगी कार्यक्रम राबविल्याबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन केले.यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन पातूर शहर विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष अर्जुनसिंह गहिलोत, उपाध्यक्ष अविनाश पोहरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॅा.रोनील आहाळे यांनी तर आभारप्रदर्शन डॅा.दिपाली घोगरे यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.