जगात जगायला शिकविते
संसारामध्ये संस्काराचा पाया रुजविते अशी जी तिला जग नारी म्हणते..
तिचे वर्णन करताना शब्दाला
बिनचूक अंकुर फुटतो
अथांग सागरी मन तिच्या
कौतुकाचे शब्द वाहून नेतो..
प्रेम,दया,माया,करुणा, पांघरून जी जगते अचेत मन कळवळ माया धरून संसार जी थाटते
मायेचा घास संसाराला भरविते..
अनुकंपा जी ची सावली घेते
अधम आसुरी स्थिती तिला
शरण जाते अशी ती अव्याहत नारी संसाराची पायाभरणी करते..
कवी – तेजस्विनी दादाराव ढोणे
शिवाजी नगर, पातूर
(नानासाहेब)


