गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : तालुक्यातील हिवरखेड येथे .डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. संलग्नित द्वारा संचालित डॉक्टर राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय बुलढाणा येथील कृषिकन्या योगिता नाजुकराव शेळके हिने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील शेतकऱ्यांना फवारणी करताना घेण्याचे दक्ष ते विषयी मार्गदर्शन केले .विषबाधा झाल्यास कोणती लक्षणे दिसून येतात व त्यावरील उपाय योजना यासंदर्भात माहिती दिली. फवारणी करताना फवारणी यंत्र वापरू नये .संरक्षक कपडे हात मोजे मास्क यांचा वापर करावा हवेच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नयेत .फवारणीचे मिश्रण काठीने ढवळावे. कीटकनाशकाच्या बाटल्या वापरानंतर जमिनीमध्ये गाळून नष्ट करण्यात तसेच त्यावरील लाल पिवळ्या निळ्या हिरव्या रंगाच्या चिन्हा कडे लक्ष द्यावे. त्यावरून रसायनातील विषयाचे प्रमाण कळते व फवारणी झाल्या नंतर स्वच्छ पाण्याने आंघोळ करून. कपडे स्वच्छ हवेत इत्यादी मुद्दे विश्लेषणसह पटवून दिले तातडीने करावयाच्या उपाययोजना व प्रथोमपचार बद्दल सांगितले महाविद्यालयांचे प्राचार्य डॉक्टर आर .यु वाघ व विषय तज्ञ प्रा. प्ररशराम हिवरे सर तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा.व्ही. एस. गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले व कार्यशाळेला गावातील शेतकरी उपस्थित होते.