सतीश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर : श्री संत नगरी शेगांव येथे कृषीमित्र संघर्ष समिती जिल्हा बुलढाणा यांची सभा पार पडली. सभेमध्ये दोन विभागात जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांची निवड करण्यात आली.पहिल्या विभागात जिल्हाध्यक्षपदी गोपाल ठोकळ यांची निवड करण्यात आली ,तसेच उपाध्यक्ष पदी .दीपक उगलमूले ,सचिव पदी,पंजाबराव मुजमुले जिल्हा कार्याध्यक्ष पदी विजय सिरसाट यांची निवड करण्यात आली,तर संदीप म्हस्के, भागवत मारोडकर, प्रवीण सरकटे, संतोष जाधव,यांची सदस्य पदी निवड करण्यात आली. यांचप्रमाणे घाटाखालील दुसऱ्या विभागमध्ये जिल्हाध्यक्ष महेंद्र बोडखे यांची जिल्हाध्यक्ष पदी तर निलेश सुरडकर यांची उपजिल्हाध्यक्ष पदी आणि आशिष देशमुख यांनी सचिवपदी निवड करण्यात आली.यामध्ये गोपाल कळके, गजानन वाघ,किशोर रांदळे,योगेश ठाकरे, यांची सदस्य निवड करण्यात आली. ही निवड कॄषीमित्राच्या न्याय व हक्कासाठीसमिती स्थापन करण्यात आली आहे. यासाठी जिल्यातील सर्व तालुकाध्यक्ष उपस्थित होते.यांची सर्वानुमते एकमताने निवड करण्यात आली, विजय सिरसाट सोनारगव्हान,भागवतभाऊ मारोडकर अंजनी बु,संतोष जाधव, विठ्ठल लोखंडे जानेफळ,दीपक उगलमूले दे.राजा,प्रवीण सरकटे, पंजाबराव मुजमुले, प्रमोदराजे जाधव सिं.राजा,विष्णू लोढे मोहदरी, आदी मान्यवर उपस्थित होते.


