किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : गुरुमाऊली फिल्म प्रोडक्शन व शिवछत्रपती साम्राज्य शिक्षण संस्था यांच्या वतीने दिला जाणारा 2021 यावर्षीचा आंतरराष्ट्रीय युवा जीवनगौरव पुरस्कार पातूरच्या पंकज सुरेश पोहरे यांना जाहीर झाला असून पंकज पोहरे यांनी टीपीसीए संस्थेच्या माध्यमातून तसेच वैयक्तिकरीत्या गेल्या चार वर्षापासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना केली. तसेच सामाजिक क्षेत्रात अकोल्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची एक विद्यार्थी एक वृक्ष मोहीमेस पंकज पोहरे यांनी विशेष पुढाकार घेऊन संपूर्ण विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीस आवाहन केले.तसेच वृक्ष लागवडीवर विशेष भर देऊन पर्यावरण जनजागृती विषयी विविध स्पर्धा राबविल्या व पुढाकार घेतला.शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना पातुर येथे मोफत एमपीएससी मार्गदर्शन केंद्र स्थापन केले,तसेच युवकांना पोलीस व सैन्य भरती मैदानी व लेखी मोफत मार्गदर्शन प्रशिक्षण व स्थानिक पातूर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन केले. व कलाक्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी राज्यस्तरीय विविध स्पर्धा राबिवण्यात आल्या व ते ऐतिहासिक ठरल्या तसेच सांस्कृतिक क्षेत्रात पंकज पोहरे हे स्वतः अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले एक मिमिक्री आर्टिस्ट कलाकार असून एकविस फिल्मी आवाजाच्या बादशाह म्हणून अकोला जिल्ह्यात नावलौकिक आहेत.त्यांच्या कलेचीे दखल घेत त्यांना मराठी दिग्दर्शकांनी चित्रपटात सुद्धा ऑफर सुद्धा केल्या.अशाप्रकारे यांच्या कार्याची दखल घेत मोलाची कामगिरी केल्याबद्दल त्यांना येत्या 31 ऑक्टोंबर रोजी अकोला येथे सुप्रसिद्ध दिग्गज मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येईल.