पवनसिंग तोडावत
ग्रामिण प्रतिनिधी अंधानेर
कन्नड: अवैधरित्या लाकुड वाहतूक करणाऱ्या ट्रकवर प्रा.वनविभागाच्या पथकाने कारवाई करत जप्त करण्यात यश आले आहे.वन विभागाच्या कडक कारवाई मुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्याचे धाबे चागलेच दनानले आहे. या बाबत अधिक माहिती अशी की दि.16 रोजी रात्री दोन वाजता मौजे देवपूळ ते वासडी रस्त्यावर निंब प्रजातीची अवैध वृक्षतोड करून विनापरवाना वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती वनविभागाच्या पथकाला मिळताच वनविभागाच्या पथकाने सापळा रचून अवैध रित्या वाहतूक करताना ट्रक क्रमांक एम एच 18 एम 3700 आढळला.सदर प्रकरणी मुद्देमालासह वाहन जप्तीची कारवाई करण्यात आली.लाकुड व्यापारी शेख साजीत रा.हस्ता ट्रक मालक मुस्तकींम शेख रा.कन्नड याच्यावर भारतीय वन अधिनियम 1927 वर गुन्हा नोंद करण्यात आला.पुढील कार्यवाही प्रादेशिक वनविभाग कन्नड यांच्याकडे सुरू आहे.ही कारवाई औरंगाबाद प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक एस.व्ही.मंकावार सहाय्यक वनसंरक्षक सचिन शिंदे वनपरिक्षेत्र अधिकारी आर.एच.साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पिशोर वनपरिमंडळ एन.एस.नांगरे वनसंरक्षक राजेश महाजन,अमोल वाघमारे, वनसेवक जैस्वाल,सोनवणे, ठोबरे या पथकाने ही कारवाई पार पाडली.