सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/देसाईगंज :-गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील दिव्यांग शाळेतील शिक्षक सचिन कुकडे हे अक्कलकोट येथे दर्शनासाठी जावुन श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन स्वामी समर्थाचे दर्शन घेतले.यावेळी श्रीमंत विजयसिंह भोसले राजेंचे वंशज अमोल राजे भोसले यांना महाराष्ट्र राज्याच्या अगदी शेवटच्या टोकावरून गडचिरोली जिल्ह्यातून भक्त मंडळी आल्याचे माहीती मिळताच त्यांनी आग्रहाने कुकडे दाम्पत्यांना बोलावून शॉल, श्रीफळ, पुस्तक देऊन सत्कार केला.यावेळी बोलताना सचिन कुकडे यांनी स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अक्कलकोट नगरीत मंदिर समितीच्या वतीने सत्कार होणे कोणत्याही स्वामी भक्ताकरिता अभिमानास्पद बाब आहे. समर्थांच्या कृपेने ही संधी मला मिळाली असून समर्थ नगरी अक्कलकोटमधील स्वामी सेवा समजून ती आपण व्यतीत करू याकरीता समर्थांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले असल्याचे मनोगत व्यक्त केले.तर यावेळी अमोल राजेंनी गडचिरोली जिल्ह्याबद्दल माहिती जाणून घेतली गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल नक्षलग्रस्त असुन अतिसंवेदनशील व अतिदुर्गम भागात वसलेला असल्याने उद्योग विरहित जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी समाजकार्याच्या हेतूने भेट देवु असे आश्वासन अमोल राजे भोसले यांनी दिले.यावेळी प्रशांत भगरे, श्याम मोरे उपस्थित होते.











