अभिजीत फंडाट ग्रामीण प्रतिनिधी मोरगाव भाकरे
बाळापुर : तालुक्यातील गायगाव येथे भाग्योदय आरोग्य व बहुद्देशिय शिक्षण संस्थेच्या वतीने ‘ लिंक वर्कर स्किम’ यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. आजच्या धावपळीच्या जीव नात कोरोनाच्या संकटात ग्रामीण भागात नागरिकांचे आरोग्यांकडे दुर्लक्ष होत आहे, नागरीकांमध्ये साथीच्या रोगांचे तसेच तत्सम प्रकारच्या रोगांची भिती निर्माण झाली आहे. कोणत्याही आजारावर उपचार होण्यासाठी प्रथमतः आजारांचे निदान होणे आवश्यक आहे, याच अनुषंगाने सदर मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. शिबीरामध्ये ब्लड प्रेशर, रकतगट तपासणी, कावीळ, थॉयराईड, यांसारख्या अनेक तपासण्या शिबीरामध्ये करण्यात आल्या. शिबीरामध्ये गावातील नागरी कांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. तसेच मोफत डोळ्यांची तपासणीही आली. भाग्योदय आरोग्य बहुद्देशिय शिक्षण संस्था ही सामाजिक कार्यात नेहमी अग्रस्थानी असुन, आतापर्यंत अनेक प्रकारची समाजपयोगी शिबीरे, उपक्रम त्यांनी राबविली आहेत . संस्थेमधील सर्व ‘ लिंक वर्कर ‘ आपले कर्तव्य निस्वार्थपणे उत्कृष्ट रीत्या बजावत आहेत . सदर शिबीराला सुरजसिंह जाधव, श्रीकृष्ण सोनोने, काळे, प्रशांत खेडकर, महेन्द्र वानखडे, अर्चना शेगावकर, सचिन इंगळे, महेंद्र मोरे यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच शिबीराला आई तुळजाभवानी नवयुवक मित्र मंडळ गायगाव व शारदा माता नवयुवक मित्र मंडळ मनाडी यांचे सहकार्य लाभले.