राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
आलापल्ली – अहेरी विधानसभा क्षेत्रातील केंद्रबिंदु समजल्या जाणाऱ्या आलापल्ली शहरात अनेक समस्या निर्माण झाले असून पाचही तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने लोकसंख्या तसेच नविन वस्त्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे येथील नागरिकांना रस्ते, वीज, आरोग्य, सिंचन, शिक्षण, रोजगार आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकासाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली आहे.
ग्रामीण विकास योजना 2515 अंतर्गत मंजुरी मिळालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आले कार्यक्रमात उदघाटक म्हणून आमदार धर्मरावबाबा आत्राम, विशेष अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भाग्यश्री आत्राम, सरपंच शंकर मेश्राम, उपसरपंच विनोद अकनपल्लीवर, पेसा अध्यक्ष स्वामी वेलादी, प्रिती इष्टाम, सामाजिक कार्यकर्ते कैलाश कोरेत, ग्रामपंचायत सदस्य सोमेश्वर रामटेके, मनोज बोल्लूवार, संतोष अर्का, स्वप्नील श्रीरामवार, पुष्पा अलोने, माया कोरेत, अनुसया सप्पीडवार, वनहक्क समितीचे अध्यक्ष देवाजी सिडाम ,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अहेरी विधानसभा प्रमुख लक्ष्मण येरावार, सामाजिक कार्यकर्ते वासुदेव पेद्दीवार, प्रभाकर आत्राम, रघुपती सिडाम, बालीकराव मडावी, गंगाराम कोरेत, प्रकाश कोरंटलावार, बाबुराव कोरेत, नारायण कासेट्टीवार, सत्यनारायण मेरगा, इरफान पठाण, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते कैलाश कोरेत यांनी केले आणि आभार अनिता कोरंटलावार यांनी मानले, पटेल मोहल्ला येथे विधानसभा निवडणुकीनंतर प्रथम आगमनाप्रसंगीच ग्रामीण विकास योजनेतुन 10लक्ष रुपये निधी उपलब्ध करून सिमेंट रस्ता बांधकाम मंजूर करण्यात आल्याने आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे पटेल मोहल्यातील नागरिकांनी पुष्पगुच्छ व पिवळा दुप्पटा देऊन समाधान व्यक्त करीत आभार मानले, याप्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.