लसीकरणाचा कार्यक्रम घेऊन नवा पायंडा सुरू करण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांचे आवाहन
किरणकुमार निमकंडे / अकोला
पातुर पोलीस स्टेशन मध्ये सोमवारी अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नवदुर्गा उत्सवाच्या नियोजनासंदर्भात शांतता समितीची बैठक पार पडली.या बैठकीमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी मार्गदर्शन केले यावेळी ज्या पद्धतीने गणेशोत्सवामध्ये पातूर शहरातील धार्मिक उत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांनी साथ दिली त्याच पद्धतीचे साथ यावेळीसुद्धा देऊन नवदुर्गा उत्सव यामध्ये सामाजिक उपक्रम राबवून हा उत्सव साजरा करावा असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी केले त्या पुढे बोलताना म्हणाल्या की कोणाची भीती अद्याप संपलेली नाही आहे आणि अकोला जिल्ह्यामध्ये लसीकरण कमी झाला आहे त्यामुळे लसीकरणाचा नवा पायंडा आपण सुरु करावा आणि लसीकरणाबाबत चे कार्यक्रम आयोजित करून जनजागृती करण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले मात्र कुठल्याही धार्मिक कार्यक्रम करता येणार नसून मिरवणूक सुद्धा काढता येणार नाही त्याकरता सर्वांनी सहकार्य करून हा उत्सव शांततेत पार पाडावा असे त्यांनी पातुर येथील शांतता सभेला मार्गदर्शन करताना व्यक्त केले
याप्रसंगी पत्रकार देवानंद गहिले, प्रदीप काळपांडे, संतोषकुमार गवई, नगरसेवक राजू उगले जगदंबा संस्थान चे विश्वस्त अंबादास देवकर यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करून नियोजनासंदर्भात मार्गदर्शन केले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मार्गदर्शन पातूरचे ठाणेदार हरीश गवळी यांनी करून नियोजनाची सूचना करून हा उत्सव शांततेने कसा पार पाडता येईल याबद्दल सूचना आणि मार्गदर्शन करून उपस्थित सर्व शांतता समिती सदस्य दुर्गा देवी उत्सव उत्सव मंडळाचे अध्यक्ष कार्यकर्ते जगदंबा देवी संस्थान चे कार्यकर्ते गावातील प्रतिष्ठित नागरिक शांतता समितीचे सदस्य यांचे आभार व्यक्त केले.यावेळी या बैठकीला पातुर पोलिस स्टेशनचे पी एस आय हर्षल रत्नपारखी, राठोड मेजर, भवाने मेजर श्रीधर पाटील अरविंद पवार यांच्यासह होमगार्ड प्रभारी समादेशक संगीता मॅडम, परसरामजी उंबरकर, सुनील गाडगे सचिन आवारा कारण पोलीस पाटील निरंजन कढोणे, श्रीकृष्ण शेगोकार , अविनाश पोहरे, सुधाकर शिंदे ,कृष्णा बोंबटकार, स्वप्निल सुरवाडे प्रमोद कढोणे, गजानन गाडगे, प्रकाश
निमकंडे, आदीसह पातूर शहरातील पत्रकार प्रतिष्ठित नागरिक देवी उत्सव मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते शांतता समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.