अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राबविला वृक्षारोपण व स्वच्छता कार्यक्रम…!
किरणकुमार निमकंडे / अकोला
पातूर : दि 12 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली केंद्र सरकार भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे आणि येथिल लोकांचा गौरवशाली इतिहास, संस्कृती आणि सामुदायिक पुढाकारासह स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या महत्वाकांक्षी अभियानांतर्गत जलशक्ती मंत्रालयाचा पेयजल आणि स्वच्छता विभागाने स्वच्छ भारत अभियान या उपक्रमांचे आयोजन केले.या अभियान अंतर्गत स्थानिक वसंतराव नाईक विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पातूरच्या वतीने रेणुका माता टेकडी परिसरात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबविले.कार्यक्रमाच्या सुरवातीला विद्यार्थी व शिक्षकांनी वृक्षारोपण केले व नंतर सर्व विद्यार्थ्यांनी परिसरातील केरकचरा उचलून परिसर स्वच्छ केला व कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी स्वच्छतेची शपथ घेतली.या कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य एस.एम.सौंदळे,पी.जे.राठोड, ए.व्ही. सोनटक्के, प्रा.जे.डी. भारस्कर, प्रा.व्ही.आर.थोरात, प्रा.आर. एम. बचाटे, प्रा.एस.टी. गाडगे, प्रा.एस.बी. आठलले, नेहरु युवा केंद्राचे विशाल राखोंडे, सौ.पल्लवी राखोंडे, पत्रकार अविनाश पोहरे,जी. एन. राऊत, सी. ए. वाघ, सौ. आर. ए. जाधव, सौ. आर.एस.देशमुख,सौ. के.डी. लोखंडे, एस. एच. जाधव, एस. बी. पोहरे, बी.डी. राठोड, जे. के. खुळे, पी. एस. शेगोकार, डी.जे.राजनकर, व्ही.डी. राठोड,श्रीमती.बी.बी.आडे,आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.