वाशिम दि 9 : आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाचे औचित्य साधून आज ९ ऑक्टोबर रोजी विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने रिसोड तालुक्यातील वाकद, मोठेगाव, बालखेडा व एकलासपूर येथे रिसोड येथील न्या.श्री कोईनकर आणि तालुका विधीज्ञ संघाचे सदस्य यांनी बालकांविषयीचे कायदे आणि महिलाविषयक कायदे या विषयांवर ग्रामस्थांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. वाशिम तालुक्यातील मंगळसा, पंचाळा व अजनखेडा येथे मंगरूळपीर येथील न्या.एस.के. मेश्राम आणि न्या.आर एस.मानकर यांनी बालकांचे शिक्षणाविषयी अधिकार याविषयी तर मालेगाव येथील न्या.श्री बोरा यांनी पोस्ट ऑफिस कार्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन केले.