अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
कोरोना महामारीच्या आजारामुळे उन्हाळी 2021 ची परीक्षा ही झाली नाही त्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांनी आपली परीक्षा फीस ही जमा केली होती परंतु परीक्षा न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना वारंवार हिवाळी 2021 ची परीक्षा फीस साठी तगादा लावण्यात येत आहे परंतु आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे विद्यार्थ्यांना पैसे भरणे कठीण झाले असून येणाऱ्या काळात परीक्षा होतील की नाही हा सुद्धा प्रश्न आहे त्यामुळे उन्हाळी 2021 व हिवाळी 2021परीक्षा फीस ही पूर्णपणे माफ करून विद्यार्थ्यांचे परीक्षा आवेदन निशुल्क स्वीकारण्यात यावे कारण परीक्षा न झाल्यास परिक्षा प्रणाली साठी लागणारा कुठल्याच प्रकारे खर्च लागत नसून त्याकरिता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ च्या निदर्शनास ही बाब रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद चे जिल्हासंघटक आकाश हिवराळे ह्यांनी आणून दिली असून या मागणीचे निवेदन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ चे परीक्षा नियंत्रक हेमंत देशमुख ह्यांना 9 ऑक्टोबर रोजी निवेदन देऊन मागणी करण्यात आली असून यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला ह्यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका अध्यक्ष सागर इंगळे, हरीष गुडधे,वैभव अवचार, आशिष हिवराळे,रॅम पवार आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.