जुबेर शेख
जिल्हा प्रतिनिधी लातुर
लातुर/लोकप्रिय आमदार बाबासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून नगरविकास खात्यामार्फत वैशिष्टपूर्ण योजनेअंतर्गत चाकूर शहरातील सिमेंट रस्ते, नाली व स्मशानभूमी शेड बांधकामासाठी भूमिपूजन सोहळा आदरणीय साहेबांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती मा.सभापती करीमसाहेब गुळवे हे होते. अहमदपूर – चाकूर मतदारसंघात अनेक विकासकामे चालू आहेत. ही विकास कामे अशीच सातत्यपूर्ण चालू राहतील, यासाठी मी कटिबद्ध आहे.
याप्रसंगी माजी जिल्हाप्रमुख शिवसेना सुभाष दादा काटे, बालाजी दादा सूर्यवंशी, माधवराव जाधव, मा.नगराध्यक्ष मिलिंदराव महालिंगे, पंचायत समिती सदस्य हरिभाऊ काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष गणेशराव फुलारी, काँग्रेस शहराध्यक्ष हुसेन पप्पू भाई शेख, शिवसेना शहर प्रमुख प्रल्हाद बाळू जाधव, ऍड. शिवप्रसाद शेटे, बिलाल खॉं पठाण, बाळू इखाणे, नागनाथ सोनटक्के, सुरज शेटे, संदीप शेटे, इलियास सय्यद, राहुल सुरवसे, संतोष जी गंभीरे, भानुदासराव पोटे, आबा कवठे, तुकाराम जाधव ,डॉ. मिर्झा, नंदकुमार पवार, अंगद पवार, दयानंदराव झांबरे, करीम साहेब डोंगरे, अनिलराव वाडकर, रामदास घुमे, विष्णूकांत तिकटे, सचिन तोरे, समाधान जाधव, अब्दुल शेख, भागवत फुले, सिताराम मोठेराव, सलीम तांबोळी, शिवदर्शन स्वामी, अविनाश गोलावार, युनूसभाई सय्यद, दत्ताजी आलमाजी, गंगाधरराव केराळे, आदित्य लवटे, नागेश बोराळे, विलासराव पाटील चाकूरकर, मधुकर कांबळे आदी उपस्थित होते.