जुबेर शेख
जिल्हा प्रतिनिधी लातुर
लातूर दि.०९.१०.२०२१
आरोग्य हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे त्यामुळे निरोगी, सुदृढ आणि सक्षम समाज निर्मिती होणे गरजेचे आहे. समाजामध्ये महिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातून आरोग्यविषयक कार्य करणे नितांत गरजेचे आहे हा दृष्टिकोन समोर ठेवून नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, लातूर, रोटरी क्लब ऑफ लातूर होरायझन, मा महारत्नदेवी काबरा माहेश्वरी महिला सशक्तिकरण ट्रस्ट, मुंबई व कलापंढरी सेवाभावी संस्था, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि.१२ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी ४ वाजता एम.आय.टी.मेडिकल कॉलेज, लातूर येथील ॲनॅाटॅामी सभागृहात “मोफत २१००० सॅनिटरी पॅड आणि २५ “निसर्ग रक्षक” इन्सीनेटर वितरण समारंभ” आयोजित करण्यात आला आहे या संबधी पत्र परिषद संपन्न झाली यावेळी रो.डॉ.विजयभाऊ राठी, अध्यक्ष, नॅब, लातूर, प्रा.डॉ.रो.संजय गवई, अध्यक्ष, रोटरी क्लब लातूर होरायझन, रो.नीलकंठ स्वामी, सचिव, रोटरी क्लब लातूर होरायझन, रो.बी.पी.सुर्यवंशी, अध्यक्ष, कलापंढरी सेवाभावी संस्था, लातूर, रो. विश्वनाथ स्वामी (सावळे) व रो.निजाम हुच्चे यांची उपस्थिती होती.
यावेळी पत्र परिषदेमध्ये बोलताना रो.डॉ.विजयभाऊ राठी म्हणाले की, शहरांमध्ये असो की ग्रामीण भागात अद्यापही सॅनेटरी पॅड वापरण्याची पद्धती पूर्णपणे अमलात येत असताना दिसत नाही. स्त्रियांचे गर्भाशयाचे आजार हे वरचेवर वाढत आहेत आणि यासाठी पॅडचा नियमित वापर न करणं हे वैद्यकीय कारण पुढे आले आहे आणि म्हणून प्रत्येक मुलींनी आणि स्त्रियांनी सॅनेटरी पॅडचा नियमित वापर करावा या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त प्रसार आणि प्रचार व्हावा आणि मिळणारे सॅनिटरी पॅड हे प्लास्टिक मुक्त मिळावे अशी आमची भूमिका आहे आणि म्हणून आम्ही स्वतः आतापर्यंत प्लास्टिक व केमिकल मुक्त एक लाख सॅनेटरी पॅड (स्नेह) मुलींना व महिलांना वाटप करण्यात आलेले आहे सॅनिटरी पॅडच्या वापराबरोबर सॅनेटरी पॅड वापरा नंतर त्याच्या विल्हेवाटीची प्रक्रिया योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे परंतु सद्यस्थितीमध्ये तसे होत असताना दिसत नाही आणि त्यामुळे ते पर्यावरणाससाठी अतिशय घातक आहे योग्य पर्यावरण टिकवण्यासाठी या सॅनेटरी पॅडचा विल्हेवाटीचा गंभीर प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीकोनातून अगदी सहजतेने व कमी खर्चात वापरण्याचे साधन आम्ही “निसर्ग रक्षक” इन्सीनेटर निर्माण केले आहे. ज्याचा वापर सहजतेने महिला करू शकतील. ही प्रक्रिया समजवण्यासाठी आम्ही प्रथमदर्शनी शाळा, संस्था आणि महिला मंडळांना वाटप करणार आहोत ज्यामुळे सॅनेटरी पॅड वापर आणि त्याची योग्य विल्हेवाट या पदव्या संबंधित योग्य शिक्षण मुलींना व महिलांना मिळेल अशा पद्धतीचा अभिनव कार्यक्रम भारतामध्ये पहिल्यांदाच नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, लातूर आणि रोटरी क्लब लातूर होरायझन यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत आहे
या समारंभाचे उद्घाटन मा.श्री.रमेशप्पा कराड, आमदार विधान परिषद, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या हस्ते संपन्न होणार असून प्रमुख अतिथी म्हणून मा.बी.पी.पृथ्वीराज, जिल्हाधिकारी, लातूर, मा.अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.लातूर, मा.सुधाकर तेलंग, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य् माध्यमीक व उच्च् माध्यमिक शिक्षण मंडळ, लातूर विभागीय मंडळ, लातूर, मा.रो.किशोर लुल्ला, टी.बी.लूल्ला चॅरिटेबल फांऊडेशन, सांगली, मा.श्रीमती तृप्ती अंधारे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक जि.प. लातूर, मा.वर्षा पवार, महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा कार्यालय, लातूर, मा.रो.डॉ.ओमप्रकाश मोतीपवळे, प्रांतपाल, रोटरी डिस्ट्रीक 3132 लातूर, मा.सनद अरवडे, माजी प्रांतपाल, रोटरी डिस्ट्रीक ३१७० सांगली, मा.डॉ.एन.पी.जमादार, डीन, एम.आय.टी.मेडीकल कॉलेज, लातूर आदींची उपस्थिती लाभणार आहे.
या प्रकल्पांतर्गत जिल्हा परिषद, लातूर अंतर्गत येणाऱ्या उत्कृष्ट ०५ शाळांमध्ये जिथे मुलींची संख्या अधिक असेल अशा ठिकाणी मोफत सॅनिटरी पॅड आणि ०५ इनसिनेटर देण्यात येणार असून कलापंढरी संस्था, लातूर अंतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्रामध्ये सॅनिटरी पॅड आणि १५ इनसिनेटर देण्यात येणार आहे तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, लातूर विभागीय मंडळ, लातूर यांना सॅनिटरी पॅड आणि ०५ इनसिनेटर वितरण करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी टी.बी.लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशन, सांगली आणि मा रत्नदेवी काबरा माहेश्वरी महिला सशक्तिकरण ट्रस्ट, मुंबई यांचे अर्थसहाय्य लाभले असून नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, लातूर, रोटरी क्लब लातूर होरायझन व कलापंढरी सेवाभावी, लातूर यांच्या सहकार्याने संस्था कार्यक्षेत्रामध्ये या प्रकल्पाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन रो.डॉ.विजयभाऊ राठी, अध्यक्ष, नॅब, लातूर, प्रा.डॉ.रो.संजय गवई, अध्यक्ष, रोटरी क्लब लातूर होरायझन, रो.नीलकंठ स्वामी, सचिव, रोटरी क्लब लातूर होरायझन, रो.बी.पी.सुर्यवंशी, अध्यक्ष, कलापंढरी सेवाभावी संस्था, लातूर आणि नॅब, रोटरी व कलापंढरी परिवार, लातूर यांनी केले आहे.या कार्यकर्माच्या आशीष बाहेती, रो.विठ्ठल कावळे, रो.सुधीर सातपुते, रो.गुणवंत बिरादार, रो.रंजीता वाघमारे, रो.महादेव पांडे, प्रतीमा कांबळे, विदया आचार्य, मुकुंद कुलकर्णी व राहुल बेळकुंदे यांनी सहकार्य केले.











